मुंबई महापालिकेत लुटालूट करत आहे वीरप्पन गँग, मनसे करणार पर्दाफाश

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 07, 2021 | 17:36 IST

Veerappan gang is looting Mumbai Municipal Corporation, MNS will expose भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणाऱ्या नगरसेवकांचा मनसे करणार पर्दाफाश, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले.

Veerappan gang is looting Mumbai Municipal Corporation, MNS will expose
मुंबई महापालिकेत लुटालूट करत आहे वीरप्पन गँग, मनसे करणार पर्दाफाश 
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिकेत लुटालूट करत आहे वीरप्पन गँग, मनसे करणार पर्दाफाश
  • भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणाऱ्या नगरसेवकांचा मनसे करणार पर्दाफाश
  • जनतेला दिलासा देण्यासाठी मनसे पुढाकार घेणार

Veerappan gang is looting Mumbai Municipal Corporation, MNS will expose ।  मुंबईः चंदन तस्कर डाकू वीरप्पन याने लोकांना लुटले नसेल एवढे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महापालिकेला लुटले आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या वीरप्पन गँगने अनेक घोटाळे केले आहेत. या गँगचा एन्काउंटर करावा लागेल. रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा, कोरोना काळात अनेक नवे घोटाळे सत्ताधाऱ्यांनी केले. जनतेला यातून दिलासा देण्यासाठी मनसे पुढाकार घेईल; असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. देशपांडेंनी एक व्हिडीओ ट्वीट करुन ही घोषणा केली. 

'आजवर तुम्ही भ्रष्टाचार करणारे नगरसेवक पाहिले असतील पण आता भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणाऱ्या नगरसेवकांचा मनसे करणार पर्दाफाश' असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. यामुळे मुंबई महापालिकेत आता सत्ताधारी शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. 

मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान

मागच्या मनपा निवडणुकीत (२०१७) शिवसेना आणि भाजप (Bharatiya Janata Party - BJP) स्वतंत्रपणे लढले होते. अनेक वर्षांपासून मुंबई मनपावर भगवा फडकता ठेवणाऱ्या शिवसेनेच्या वर्चस्वाला पहिले खिंडार पडेल अशी शक्यता निवडणुकीत निर्माण झाली. शिवसेनेला भाजपपेक्षा फक्त दोन जागा जास्त मिळाल्या. (*मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७ निकाल (एकूण जागा २२७) - शिवसेना ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे ७, समाजवादी ६, एआयएमआयएम २ आणि इतर ६) पण बहुमत मिळाले नाही. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेने महापौर नियुक्त करावा आम्ही विरोध करणार नाही असे सांगत स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवले होते. काही काळानंतर मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन सेनेने स्वतःची बाजू सावरली. पण शिवसेनेला मुंबईत हरवणे शक्य आहे हे पहिल्यांदाच ठळकपणे दिसले होते. या नंतर ऐन कोरोना संकटात वरळीत शिवसेनेच्या 'युवा' नेतृत्वाच्या मतदारसंघात मनसेचे वारे वाहू लागले. वरळी मतदारसंघातील अनेक लहान-मोठ्या संघटना शिवसेनेऐवजी मनसेवर विश्वास ठेवत असल्याचे चित्र आहे.

मुंबईत अनेक मतदारसंघ आहेत जिथे शिवसेनेचा वरचष्मा होता तिथे सध्या भारतीय जनता पार्टी किंवा मनसेचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी राज्यातील सत्तेमुळे शिवसेनेला इच्छा असो वा नसो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जुळवून काम करावे लागत आहे. यामुळे शिवसेनेचा परंपरागत मतदार दुखावल्याची आणि दुरावल्याची चर्चा आहे. शिवसेना नेतृत्व हे नाकारत असले तरी विरोधकांनी निवडणुकांचा विचार करुन शिवसेनेची कोंडी करण्यासाठी आक्रमक होण्यास सुरुवात केली आहे. संदीप देशपांडे यांनी केलेली ताजी घोषणा ही सत्ताधारी पक्षाविरुद्धची त्यांची आक्रमक खेळी असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी