Vegetables Price Hike :ऐन दिवाळीत सामान्यांना महागाईचा झटका, भाज्यांचे दर भिडले गगनाला

Vegetables Price Hike : ऐन दिवाळीत महागाई वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांना झटका बसला आहे. ऐन दिवाळीत भाजीपाला महागला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला आणि पिकं उध्वस्त झाली आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने त्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

vegetable price  hike
 फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऐन दिवाळीत महागाई वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांना झटका बसला आहे.
  • ऐन दिवाळीत भाजीपाला महागला आहे.
  • राज्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला आणि पिकं उध्वस्त झाली आहे.

Vegetables Price Hike :  मुंबई : ऐन दिवाळीत महागाई वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांना झटका बसला आहे. ऐन दिवाळीत भाजीपाला महागला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला आणि पिकं उध्वस्त झाली आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने त्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. (vegetable price hike in mumbai and maharashtra due to unseasonal rain and fuel price hike )

अधिक वाचा : Accident News कार-ट्रकचा भीषण अपघात, मुंबईतील कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी

घाटकोपर, अंधेरी, खार, माटुंगा आणि बोरिवली भागात प्रतिकिलो टोमॅटोची किंमत 60 ते 80 रुपये झाली आहे. पालक पूर्वी 10 ते 15 रुपये किलोने मिळात होते आज त्यांची किंमत 50 ते 60 रुपये किलो झाली आहे. भेंडी आणि पडवळ 120 रुपये किलो झाली आहे. एक किलो गवार 160 रुपयांना विकली जात आहेत. तर फुलकोबीची किंमत घाऊक बाजारात 500 रुपये किलो झाली आहे. इंधनाचे दर वाढण्यापूर्वी प्रतिकिलो टॉमॅटोची किंमत 25 रुपये इतकी होती. परंतु इंधनाचे दर वाढल्याने चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची किंमत 40 रुपये किले झाली आहे. बहुंतांश भाज्यांची किंमत 120 ते 140 रुपये किलो झाली आहे. 

अधिक वाचा :  Achalpur News : धार्मिक स्थळासमोर फटाके फोडल्याने दोन गटात मोठा तणाव

पूर्वी किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो भाजीचे दर होते, परंतु त्यात आता कमालीची वाढ झाली असून बाजारात 120 ते 140 रुपये किलोने भाजी मिळत आहे. इंधनाचे दर आणि वाहतूकीचे भाडे वाढल्याने भाज्यांचे दर वाढल्याचे भाजी विक्रेत्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात अवकाळी पावसामुळे टॉमॅटोचे पीक उध्वस्त झाले आहे, त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा न झाल्याने भाज्यांचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात नवीन पीक येईल आणि मागणी आणि पुरवठा योग्य प्रमाणात झाल्यावर हे दर कमी होतील. सद्यकाळात फक्त 20 ते 30 टक्के पीकं व्यवस्थित आली आहेत. बाकी पिकांची अवस्था वाईट आहे त्यामुळेच महागाई वाढली आहे. एकीकडे भाज्यांचे दर वाढत असताना इतर वस्तूंचेही दर वाढत आहे. सीनजी प्रति किलो किंमत 86 रुपये झाली आहे. तसेच खाद्य तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. 

अधिक वाचा : शिंदे-फडणवीसांचं ठरलं !, दिवाळीनंतर नाराज आमदारांसाठी शोधून काढला 'रामबाण' उपाय

अंधेरीतील लोखंडवाला भागात मंगळवारी एक किलो टोमॅटोची किंमत 60 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पालक 50 रुपये किलो, भेंडी 120 रुपये किलो, गावार 160 रुपये किलो झाली आहे. घाटकोपरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 80 रुपये किलो झाली आहे. माटुंग्यात टोमॅटोची प्रति किलो किंमत ७0 ते 80 रुपये झाली आहे. तर पडवळ 120 रुपये किलो झाली आहे. वांगे 80 रुपये तर फरसबी प्रति किलो किंमत 120 रुपये झाली आहे. 

अधिक वाचा : molestation Case : व्याकरण शिकवणाऱ्या मास्तरचं होतं खराब चरित्र, क्लासमधील मुलींचा करायचा विनयभंग, 11 विद्यार्थिनीं केलीय तक्रार


घाऊक बाजारात फुलकोबी पूर्वी 35 ते 40 रुपये किलोंना मिळत होती. आता घाऊक बाजारात फुलकोबीची किंमत 500 रुपयांना विकली जात आहे. कोबी पूर्वी 8 रुपये किलोने मिळत होती आता त्याची किंमत 40 रुपये झाली आहे.16 ते 18 रुपये किलोने मिळणारी कॉलीफ्लॉवर आता 60 रुपये किलोने मिळत आहे. पूर्वी लिंबू पन्नास पैश्यांना मिळायचा आता एक लिंबू 4 ते 5 रुपयांना मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी