Vande Metro trains मुंबईमध्ये एसी लोकल स्वरूपात चालण्यासाठी लोकांमध्ये एकमत आवश्यक- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई
Updated Apr 06, 2023 | 14:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai AC Local : काश्मीरच्या वंदे मेट्रो गाड्यांची रुपांतरित आवृत्ती मुंबईत एसी लोकल म्हणून चालवण्यासाठी मुंबईकरांमध्ये एकमत असणे आवश्यक आहे, असे काश्मीर खोऱ्यातील सर्वात उंच रेल्वे पुलाला भेट दिल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Version of Vande Metro trains could ply as AC locals in Mumbai: Railway minister
एसी वंदे मेट्रो आणि वंदे भारत ट्रेन हे भारताचे भविष्य, मुंबईत लवकरच !  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वैष्णव पुढे म्हणालेकी एसी वंदे मेट्रो आणि वंदे भारत ट्रेन हे भारताचे भविष्य असून, या ट्रेन देशभर चालवण्याचा आमचा उद्देश आहे. 
  • मात्र, मुंबईकरांमध्ये अद्याप एसी लोकलबाबत एकमत नाही.
  •  काश्मीर खोऱ्यातील चिनाब येथील जगातील सर्वात उच रेल्वे पुलाच्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

मुंबई : मुंबईतील एसी लोकलच्या स्थितीबद्दल प्रसारमध्यमांनी विचारले असता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईकरांनी परवानगी दिल्यास आम्ही सध्याची एसी लोकल बदलून वंदे मेट्रो ट्रेनची सानुकूलित आवृत्ती एसी लोकल म्हणून चालवू शकतो.  काश्मीर खोऱ्यातील चिनाब येथील जगातील सर्वात उच रेल्वे पुलाच्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. (Version of Vande Metro trains could ply as AC locals in Mumbai: Railway minister)

अधिक वाचा : ​'अँजिओप्लास्टी'नंतर सुष्मिता सेनने सुरु केला एक्सरसाईज

वैष्णव पुढे म्हणाले, मुंबईकरांनी सहमती दिल्यास आम्ही मुंबई एसी लोकलचे रूप बदलू शकतो. परंतु मुंबईकरांमध्ये अद्याप एसी लोकलबाबत एकमत नाही. ते म्हणाले की एसी वंदे मेट्रो आणि वंदे भारत ट्रेन हे भारताचे भविष्य असून, या ट्रेन देशभर चालवण्याचा आमचा उद्देश आहे. 

काश्मीर खोऱ्यातील चिनाब पुलावर रेल्वे ट्रॅक टाकण्यात आला असून, सोमवारी त्याची आणि ट्रॉलीची तपासणी करण्यात आली. चिनाब पूल आणि अंतिम 111- कीमी मार्गाचे भाग असलेले उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (USBRL) हे स्थानक लिंक केले जाणार आहे, त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी थेट रेल्वे सेवा मार्ग उपलब्ध होणार आहे.

अधिक वाचा : ​माॅडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी पृथ्वी शाॅवर गुन्हा दाखल

जगप्रसिद्ध चिनाब पूल हा नदीच्या खोऱ्यापासून तब्बल 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाबद्दल वैष्णव सांगतात की "जानेवारी किंवा 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि एकदा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, या ट्रॅकवर धावणारी खास ट्रेन ही वंदे भारत ट्रेन पहिली ट्रेन असणार आहे."
   
ते पुढे म्हणाले "हा एक अतिशय आव्हानात्मक प्रकल्प होता, कारण पुढील 100 वर्षे टिकेल असा एक मोठा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हा पूल 8 तीव्रतेहा भूकंप सहन करू शकतो.  या प्रकल्पासाठी 2022-23 मध्ये सहा कोटी निर्धारित केला आहे, 2014 पूर्वी हे प्रतिवर्षी 800 कोटी इतकेच होते. याद्वारे काश्मीर खोरे  भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. जम्मू येथे अभियंत्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण अकादमी देखील तयार केली जाईल. 

अधिक वाचा : ​WhatsApp, Facebook Messagesने द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

272 कीमी लांबीच्या USBRL प्रकल्पामध्ये 118 किमीचा काझीगुंड-बारामुल्ला हा विभाग ऑक्टोबर 2009 रोजी कार्यान्वित झाला. तर 18 किमीचा बनिहाल-काझीगुंड आणि 25 किमीचा उधमपूर-कटरा भाग अनुक्रमे जून 2013 आणि जुलै 2014 मध्ये कार्यान्वित झाला आहे. सध्या कटरा-बनिहाल विभागातील अंतिम 111 किमी पल्ल्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी