Mumbai Ganpati: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 21, 2022 | 14:40 IST

BMC Ganeshotsav Rules: मुंबईतील गणेशोत्सव मंडळासाठी मुंबई महापालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. जाणून घ्या मुंबई महापालिकेने नेमके काय नियम लागू केले आहेत.

very important update for ganeshotsav mandals in mumbai mumbai municipal corporation has issued rules
Mumbai Ganpati: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिकेने जारी केली गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली
  • पाहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणकोणते नियम पाळावे लागणार
  • दोन वर्षानंतर गणेशोत्सवावरील सर्व बंधनं हटली

Mumbai: मुंबई: आपल्या लाडक्या गणरायाच्या (Ganpati Bappa)आगमनाला आता अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता राज्यभरात आणि मुंबईत (Mumbai) मोठी लगबग सुरु झाली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या (Corona) संकटामुळे राज्यातील सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. गणपती उत्सवावर देखील अनेक मर्यादा आल्या होत्या ज्याचा सर्वाधिक फटका हा गणेशोत्सव मंडळांना बसला होता. मात्र, आता राज्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने राज्य सरकारने सगळे सण पूर्वीप्रमाणेच जल्लोषात साजरे करण्याचं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. मात्र, असं असलं तरीही मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून नवी नियमावली जारी करण्यात आली. त्यामुळे उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना काही नियम मात्र गणेश मंडळांना पाळावे लागणार आहेत. (very important update for ganeshotsav mandals in mumbai mumbai municipal corporation has issued rules)

मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आज नवे नियम जाहीर केले आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे बाप्पाचा मूर्तीच्या उंचीवर बंधनं घालण्यात आली होती. मात्र, यंदा मूर्तीच्या उंचीवर फारशी बंधनं असणार नाहीत. मात्र, मुंबई महापालिकेने मंडपाच्या उंचीवर मात्र बंधनं घातली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची उंची ही ३० फुटांच्या वर असू नये असा नियम पालिकेने जारी केला आहे.

अधिक वाचा: मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचे आयोजन, मुंबई-पुण्यातील आवडत्या बाप्पांचे करता येणार दर्शन

मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी कोणकोणते नियम केले जारी?

  1. मंडपाची उंची ३० फुटापर्यंत ठेवणं बंधनकारक
  2. मंडप परिसरात खड्डे आढळल्यास 2 हजारांचा दंड
  3. मंडपामध्ये कोणताही स्टॉल उभारता येणार नाही

दरम्यान, मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. मात्र आता कोणतीही बंधनं नसल्याने मंडळं आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच बाजारपेठाही विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातही आनंदाचं वातावरण आहे. तर मुंबईत आजपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांच्या आगमन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.  

अधिक वाचा: Hartalika 2022: कशी करतात हरतालिकेची पूजा?; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, कहाणी आणि महत्त्व

गणेशोत्सव मंडळांना नोंदणी शुल्कात सूट

राज्यातील गणेशोत्सव सुरळीत पार पडायला हवेत यासाठी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासोबतच सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडपाची लागणारी परवानगी प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपाच्या संदर्भात कुठलेही शुल्क न घेण्याचेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी