Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनासह न्युमोनियाचीही लागण, आयसीयूत ऑक्सिजन सपोर्टवर, दीदींची प्रकृती स्थिर

Lata mangeshkar in icu गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असून त्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लता मंगेशकर बर्‍या व्हाव्यात म्हणून देश आणि जगात त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना सुरू आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांना शनिवारी कोरोनाची लागण.
  • लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू.
  • लता दीदी ऑक्सिजन सपोर्टवर.

Lata Mangeshkar : मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांना शनिवारी कोरोनाची (corona) लागण  झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत (ICU) उपचार सुरू असून त्या ऑक्सिजन सपोर्टवर (oxygen support) आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लता मंगेशकर बर्‍या व्हाव्यात म्हणून देश आणि जगात त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना सुरू आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांची भाची रचना यांनी दिली आहे. (veteran singer lata mangeshkar in icu oxygen support stable condition )


प्रकृती स्थिर, चाहत्यांचे आभार

लता दीदींच्या भाची रचना शहा यांनी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. देवाची कृपा आहे आणि दीदी यातून बाहेर येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याने रचना यांनी आभार मानले आहे. डॉक्टर चांगले काम करत असल्याचेही रचना शहा यांनी सांगितले आहे. 


कोरोनासह न्युमोनियाची लागण

लता दीदी यांची प्रकृती सुधारत आहे. सध्या त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांना भेटण्याची परवानगी नाहिये. लता दीदींवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. लता दीदींवर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत, तसेच १०-१२ दिवस त्या डॉक्टरांच्या निगराणीखाली राहतील. लता दीदींना कोरोनासह न्युमोनियाचीही लागण झाली आहे. 


घरातल्या नोकरांमुळे कोरोनाची लागण

लतादीदींच्या घरातील नोकर सामान आणण्यासाठी बाहेर जायचे. त्यांच्या घरातील एका नोकराला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या संपर्कात आल्याने लतादीदींना कोरोनाची लागण झाली. लतादीदींची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. लतादीदींच्या कुटुंबीयातील त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचीही कोरोना टेस्ट करणयत आली पण त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. लतादीदी पेडर रोडवरील  घरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात.

जेव्हापासून लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे, तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. २०१९ साली लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत होता, तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदी देशाच्या गानसम्राज्ञी असून संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. ७८ वर्षाच्या कारकीर्दीत लतादीदींनी २५ हजार गाणी गायली आहेत.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी