VIDEO: ७ सेकंदाचा हा अंगावर काटा आणणारा मुंबईतील रेल्वेचा व्हिडिओ

मुंबई
Updated Apr 19, 2021 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Train Incident Video:सेंट्रल रेल्वे मुंबईमधील एक अंगावर काटे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात पॉईंटमनने अवघ्या ७ सेकंदामध्ये एका चिमुकल्याचा जीव वाचवला.

railway video
७ सेकंदाचा हा अंगावर काटा आणणारा मुंबईतील रेल्वेचा VIDEO 

थोडं पण कामाचं

  • ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
  • मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी असाच या छोट्या मुलासाठी देवदूत बनून आला
  • रेल्वेचा हा पॉईट्समन खऱ्या जगातील सुपरहिरो ठरला

मुंबई: असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी. असेच काहीसे मुंबईच्या वांगणी रेल्वे स्टेशनवरील एका छोट्या मुलासोबत घडले आहे. अनेकदा असे घडते की कोणीतरी देवदूत म्हणून मदतीला धावून येते. मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी असाच या छोट्या मुलासाठी देवदूत बनून आला आणि त्याने प्राण वाचवले. तो जर धावत आला नसता तर आज काही वेगळेच चित्र असते.

ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आई आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून चालत जात असते. यावेळी मुलाचा हात सुटतो आणि तो रेल्वे रूळावर पडतो. समोरून पाहतो तर काय भरधाव वेगाने एक्सप्रेस येत असते. हे सर्व रेल्वेच्या पॉईंट्समनला दिसले.

त्याचक्षणी तो वाऱ्याच्या वेगाने तिथे धावत येतो आणि मुलाला वर प्लॅटफॉर्मवर ठेवतो आणि स्वत:ही लगेच वर चढतो. असे करत असताना यात त्याचा स्वत:चाही जीव गेला असता. मात्र त्याने असा कोणताही विचार केला नाही. त्यावेळी त्याच्यासाठी त्या मुलाचा जीव वाचणे सर्वात महत्त्वाचे होते.

अनेक सिनेमांमध्ये आपण सुपरहिरो बघतो. जो स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवतो. रेल्वेचा हा पॉईट्समन खऱ्या जगातील सुपरहिरो ठरला. मयुर शेळले असे या पॉईट्समनचे नाव आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल रेल्वेनेही ट्वीट करून त्यांचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी