भाजपमध्ये आतापासूनच इच्छुक विधानपरिषदेसाठी लावतायेत फिल्डिंग, 'या' नेत्यांची नावे चर्चेत

vidhan parishad election 2022 praveen darekars name confirmed : विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेमकं कोणाला उमेदवारी द्यावी याचा विचार भाजपच्या वतीने केला जात आहे. त्याचबरोबर नेत्यांकडून देखील आपली वर्णी कशी लागते यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. असं असले तर निवडक नेत्यांची नावे निश्चित मानली आहेत. ज्यामध्ये प्रवीण दरेकर हे आहेत. तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कोणत्याही एका नेत्याला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.

vidhan parishad election 2022 praveen darekars name confirmed
भाजपमध्ये आतापासूनच इच्छुक विधानपरिषदेसाठी लावतायेत फिल्डिंग 
थोडं पण कामाचं
  • भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या
  • प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी एकाला मिळू शकते संधी?
  • माजी मंत्री पंकजा मुंडेंसह या नेत्यांच्या नावाची चर्चा?

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. २४ मे रोजी या राज्यसभा निवडणूकीची अधिसूचना जारी होऊन १३ जूनला ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या असल्याचं पहायला मिळत आहे. इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी देखील बरीच मोठी आहे. भारतीय जनता पार्टीकडे चार जण निवडणून जाण्याइतके संख्याबळ आहे.

अधिक वाचा : आता वाहतूक पोलिस तुमची गाडी थांबवू शकणार नाहीत, नवीन नियम...

प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी एकाला मिळू शकते संधी?

दरम्यान, विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेमकं कोणाला उमेदवारी द्यावी याचा विचार भाजपच्या वतीने केला जात आहे. त्याचबरोबर नेत्यांकडून देखील आपली वर्णी कशी लागते यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. असं असले तर निवडक नेत्यांची नावे निश्चित मानली आहेत. ज्यामध्ये प्रवीण दरेकर हे आहेत. तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कोणत्याही एका नेत्याला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते. अशी सूत्रांची माहिती आहे.

अधिक वाचा ; धर्म द्वेषाचा बळी ठरले मतीमंद भवरलाल ; मुसलमान समजून मारहाण

माजी मंत्री पंकजा मुंडेंसह या नेत्यांच्या नावाची चर्चा?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कुठल्याची कोणत्या नेत्याला विधान परिषदेसाठी संधी मिळणार हे स्पष्ट झालं नाही. तर, भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका महिलेला संधी मिळू शकते. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे किंवा चित्रा वाघ यांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांची नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

अधिक वाचा ; बजरंगबली आणि शनिदेव यांना हा महिना प्रिय, साडेसाती होईल दूर 

निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता आहे.

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी  आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी