'या' व्यक्तीलाच मुख्यमंत्री बनवा, सोशल मीडियात होतेय मागणी

मुंबई
Updated Nov 07, 2019 | 19:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Sena vs BJP: शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेला संघर्ष अद्यापही सुरुच आहे. त्यातच आता सोशल मीडियात एक वेगळीच मागणी जोर धरु लागली आहे.

vidhan sabha election result mns mla raju patil social media users demand viral message maharashtra news marathi
'या' व्यक्तीलाच मुख्यमंत्री बनवा, सोशल मीडियात होतेय मागणी  

थोडं पण कामाचं

 • महाराष्ट्राची सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती?
 • कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 
 • सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपत रस्सीखेच
 • सत्ता संघर्षात सोशल मीडियात होतेच वेगळीच मागणी

मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तेरा दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप नव्या सरकारची सत्ता स्थापन झालेली नाहीये. निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे मात्र, महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला असतानाच आता सोशल मीडियात एक वेगळीच मागणी होताना दिसत आहे.

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजप दोघेही अडून बसले आहेत आणि त्यामुळेच अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाहीये. याच दरम्यान सोशल मीडिया युजर्सने एका व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. ही व्यक्ती आहे राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार राजू पाटील.

सोशल मीडियात मेसेज व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, "मुख्यमंत्री पदासाठी फक्त एक माणूस लागतो, माझा एक आलाय त्याला करा आणि विषय संपवून टाका." व्हायरल होणाऱ्या या मेसेजखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो आहे.

कोण आहेत राजू पाटील?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शंभरहून अधिक जागांवर निवडणूक लढवली. मात्र, मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आहे. ही जागा आहे कल्याण ग्रामीणची. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव केला.

कल्याण ग्रामीण मतदारसंघाची निवडणूक

प्रमोद (राजू) पाटील - मनसे - ९३८१८ मते

रमेश म्हात्रे - शिवसेना - ८६६६८ मते

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...