आदित्य ठाकरेंची निवडणूक लढविण्याची घोषणा आणि  संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

मुंबई
Updated Sep 30, 2019 | 18:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

काही दिवसांपूर्वी आमचे चंद्रयान काही तांत्रिक कारणासाठी चंद्रावर उतरू शकले नाही. पण शिवसेनेचे हे सूर्ययान (आदित्य यान)  २१ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही,

vidhansabha election 2019 aditya thackeray shiv sena sanjay raut worali news in marathi
आदित्य ठाकरेंची निवडणूक लढविण्याची घोषणा आणि  संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचे हे सूर्ययान (आदित्य यान)  २१ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही
  • वरळीत शिवसेनेने विजय संकल्प मेळाव्यात राऊत बोलत होते.  
  • आज या महाराष्ट्राचा छावा राजकारणात आला आहे.

मुंबई :  काही दिवसांपूर्वी आमचे चंद्रयान काही तांत्रिक कारणासाठी चंद्रावर उतरू शकले नाही. पण शिवसेनेचे हे सूर्ययान (आदित्य यान)  २१ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार भाषणबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज वरळीत केली. शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळीतून आपली उमेदवारी स्वतः जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळणाऱ्या राऊत यांनी जोरदार आदित्य ठाकरे यांच्याबाजूने बँटिंग केली. 

वरळीत शिवसेनेने विजय संकल्प मेळाव्यात राऊत बोलत होते.  ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता, तो क्षण  आज आला आहे. महाराष्ट्र आपला आभारी आहे, की तुम्ही महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहेत, त्यामुळे महाराष्ट्र आपला आभारी असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

या ठिकाणी महालक्ष्मी आहे, हाजीअली आहे, आणि महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असे राऊत म्हणाले. आपल्या सामनाच्या संपादकीय स्टाइलने दावे राऊत यांनी यावेळी केली.  आज या महाराष्ट्राचा छावा राजकारणात आला आहे. जेव्हा शिवाजीचा छावा या महाराष्ट्राच्या राजकारणात आला, तेव्हा या देशाचे राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण बदलू गेले. त्यामुळे आजपासून महाराष्ट्राचे राजकारण मातोश्रीच्या आसपास केंद्रीत झाल्याशिवाय राहणार नाही.

 

आदित्य ठाकरे या देशाचे नेते झाले आहेत. लहानपणापासून मी आदित्य ठाकरेंना पाहत आलो आहेत. त्यांची झेप आणि कामाचा आवाका मी पाहिला आहे. आज बाळासाहेब ठाकरे आज आपल्या असते तर त्यांनाही वाटले असते की ज्या शिवसेनेसाठी ५० वर्ष संघर्ष केला, पण आजचा दिवस पाहता आला असता तर मलाही धन्य होता आले असते, असेही राऊत म्हणाले. 

ठाकरे परिवारातील कोणी निवडणुकीत उतरणार नाही, अशी दंतकथा होती. हे जरी सत्य असलं तरी इतिहास घडविताना काही नियम बाजुला ठेवायचे असतात. आजचा माहौल पाहून मिस्टर ट्रम्प प्रचारासाठी तुम्हांलाही अमेरिकेला बोलवतील आणि आम्ही सुद्धा घोषणा देऊ 'हाऊडी अॅडी' असा टोलाही संजय राऊत यांनी मोदी यांना लढविला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी