अजित पवारांनी केली मोठी मागणी, शिवसेनेसमोर पेच 

मुंबई
Updated Nov 27, 2019 | 19:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपसोबत ७८ तासांचे सरकार स्थापन करून पुन्हा स्वगृही परतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एक मोठी मागणी केली आहे.

vidhansabha election 2019 ajit pawar cm post ncp shiv sena  news in marathi
अजित पवारांनी केली मोठी मागणी, शिवसेनेसमोर पेच  

मुंबई :  भाजपसोबत ७८ तासांचे सरकार स्थापन करून पुन्हा स्वगृही परतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एक मोठी मागणी केली आहे.  महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, अशी मागणी अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठकीत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रथम प्रस्ताव शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठविल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी मांडला होता. त्यांच्यानुसार यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत यात केवळ दोन आमदारांचा फरक आहे. सत्ता स्थापन करायची असेल तर राष्ट्रवादी शिवाय शिवसेनेला पर्याय नाही आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देऊन उर्वरित काळासाठी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळावे अशी माझी अपेक्षा आहेत, असे अजित पवार यांनी आपली मागणीचे समर्थनार्थ मत व्यक्त केले होते. 

भाजपचे १०५ आमदार असताना शिवसेना समसमान वाटप करण्याची भाषा करत आहेत. तर आपले तर दोनच आमदार कमी आहेत. अशा परिस्थितीत आपल्यासोबत त्यांनी मुख्यमंत्रीपदही वाटून घ्यावे, अशी मागणी आमदारांच्या बैठकीत केली आहे. आता हीच मागणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत पुन्हा अजित पवार करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

शिवसेनेने अजित पवार यांची मागणी मान्य केली नाही तर अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी