मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अत्यंत जलद नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक मोठा निरोप आमदारांकडून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडायची नसेल तर त्यांनी थेट भाजपसोबत चला असा निरोप अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्याकडे ५४ पैकी बहुतांशी आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या संपर्कात २५ ते २७ आमदार आहेत आणि त्यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे.
आज सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. या बाबतीत शरद पवार यांनाही याबाबत धक्का बसला. अजित पवार यांनी पक्षाच्या कामासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्राचा वापर भाजपला पाठिंबा देण्यासाठी केला.
अजित पवार यांच्यासोबत शपथविधीसाठी ११ आमदारांची उपस्थिती होती. आता त्यातील ७ आमदार परत आले असून काल पासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित झाले. या बैठकीत या ११ आमदारांकडे अजित पवार यांनी हा निरोप दिला असल्याची माहिती समोर येत आहे.