उद्धव ठाकरेंनी दिली अजित पवारांना 'मोठी ऑफर'

एका रात्रीत भाजपच्या गोटात सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.

vidhansabha election 2019 ajit pawar uddhav thackeray sharad pawar gave big offer news in marathi
उद्धव ठाकरेंनी दिली अजित पवारांना 'मोठी ऑफर'  |  फोटो सौजन्य: Times Now

 मुंबई :  एका रात्रीत भाजपच्या गोटात सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.  आता यात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल बंद दाराआड बैठक झाली. यात अजित पवार यांची कशी मनधरणी करता येईल यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 

यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना स्वगृही आणण्यासाठी एक ऑफर दिली आहे. त्यानुसार शरद पवार यांनी सांगितले आणि काँग्रेसला मंजूर असेल तर शिवसेना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद स्वीकारून उर्वरीत अडीच वर्षांसाठी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहे. पण यात पहिले अडीच वर्ष हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी अट उद्धव ठाकरे यांनी टाकल्याची माहिती समोर येत आहे. 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हा मेसेज घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे गेले होते. पण त्यांना अजून त्यांची मनधरणी करण्यात यश आलेले नाही. अजित पवार यांच्या मनधरणीसाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांच्या भावाच्या घऱी आणि नंतर त्यांच्या घरी, तर आज विधीमंडळ परिसरात त्यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या  या वागणुकीबद्दल उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासाठी ते स्वतःचा हट्ट बाजूला ठेऊन अजित पवार यांना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी