राज्यपालांना भेटल्यावर चंद्रकांत पाटील म्हटले असं काही... 

मुंबई
Updated Nov 07, 2019 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra LIve : सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला सामन्यपेक्षा अधिक वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीची माहिती करून देण्यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो.

vidhansabha election 2019 BJP delegation comprising of Girish Mahajan, Chandrakant Patil Sudhir Mungantiwar and Ashish Shelar met Governor Bhagat Singh Koshyari  news in marathi
राज्यपालांना भेटल्यावर चंद्रकांत पाटील म्हटले असं काही...   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला सामन्यपेक्षा अधिक वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीची माहिती करून देण्यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो. या भेटीत राज्यपालांशी सविस्तर चर्चा झाली आहे.  त्यामुळे आता या चर्चेनंतर आता काय भूमिका घ्यायची रणनिती ठरविणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. 

भारतीय जनता पक्षातर्फे चार नेते आज दुपारी २ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले,  महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी आणि पुढील पाच वर्ष कारभार करण्यासाठी स्पष्ट बहुमत दिले आहे. पण हे सरकार स्थापन करण्यासाठी सामन्यपेक्षा अधिक वेळ लागत आहे. या संदर्भात काय कायदेशीर मुद्दे आहेत तसेच महाराष्ट्रात झालेल्या या पेचप्रसंगाच्या परिस्थितीची माहिती राज्यपालांना अवगत करून दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

राज्यपालांच्या या भेटीनंतर यापुढे काय रणनिती आखायची आहे, याची निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी