बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप राज्यपालांकडे मागणार इतका वेळ 

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 21:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करणार का अशी विचारणा केली आहे. या संदर्भात त्यांना येत्या ११ तारखेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल

vidhansabha election 2019 bjp govt formation majority flower test maharashtra  news in marathi
बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप राज्यपालांकडे मागणार इतका वेळ   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करणार का अशी विचारणा केली आहे. या संदर्भात त्यांना येत्या ११ तारखेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली आहे. या संदर्भात भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप सत्ता स्थापनेसाठी दावा दाखल करणार असून बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस ते १ महिन्याचा कालावधी मागू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील निवडणुकांत भाजप हा १०५ आमदारासह पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. परंतु, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले १४५ आमदारांचे पाठबळ त्यांच्याकडे सध्या नाही. अपक्षांच्या मदतीने ही संख्या १२० च्या घरात जाऊ शकते. त्यामुळे त्यांना अजून २५ आमदारांची गरज आहे. राज्यातील निवडणुका भाजप-सेना आणि मित्र पक्षांनी महायुती म्हणून लढले. परंतु, शिवसेना सत्तेचे समसमान वाटप करण्याचा मुद्द्यावरून अडून बसली त्यामुळे १४५ची मॅजीक फिगर गाठण्यात भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. 

काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण राज्यपालांनी पुढील सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याचे त्यांना आदेश दिले. आता आज सायंकाळी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात पुढाकार घेऊन भाजपला सत्ता स्थापनेची तयारी आहे का या संदर्भात चाचपणी केली. त्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. आता भाजपची उद्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात सत्ता स्थापनेचा दावा दाखल करायचा की नाही यावर चर्चा होणार आहे. पण भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार असून येत्या १३ तारखेला राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. 

अशा परिस्थिती आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला राज्यपालांकडून वेळ दिला जाऊ शकतो. त्यावेळी भाजप राज्यपालांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस ते १ महिन्याचा कालावधी मागू शकतो अशी माहिती समोर येत आहे.

कर्नाटकात नाही मिळाला १५ दिवसांचा अवधी

कर्नाटकमध्ये असाच पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आणि १५ दिवसांचा कालावधी दिला. पण कोर्टाने हा कालावधी फेटाळला आणि तात्काळ बहुमत सिद्ध करायला लावले होते. अशा परिस्थिती येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण जेडीएस आणि काँग्रेसने त्यांच्या विरोधात मतदान करून हे सरकार पाडले होते. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...