राष्ट्रवादी आणि काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप घेऊ शकतो हा विचित्र निर्णय? 

मुंबई
Updated Nov 07, 2019 | 21:34 IST

गेली १५ दिवस सुरू असलेल्या सत्ता संघर्ष मिटविण्यासाठी तसेच शिवसेनाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना रोखण्यासाठी भाजप उद्या एक मोठा आणि विचित्र निर्णय घेऊ शकत

vidhansabha election 2019 bjp have shocking formula for govt formation news in marathi
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप घेऊ शकतो हा विचित्र निर्णय?   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजप श्रेष्ठींना मनावर दगड ठेऊन घ्यावा लागेल हा निर्णय
  • त्या पेक्षा अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा पर्याय खूप चांगला
  • सत्तेची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत विचित्र पर्याय

मुंबई :  गेली १५ दिवस सुरू असलेल्या सत्ता संघर्ष मिटविण्यासाठी तसेच शिवसेनाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना रोखण्यासाठी भाजप उद्या एक मोठा आणि विचित्र निर्णय घेऊ शकतो. सत्ता समिकरणात सोशल मीडिया आणि इतर प्रसार माध्यमांमध्ये पर्याय येत असताना असा पर्याय जो कोणी विचारही केलेला नाही, तो पर्याय भाजप राज्याच्या जनतेला देऊ शकते. मात्र यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी मनावर दगड ठेवण्याची गरज आहे. 

तर तुम्ही म्हणाल, काय आहे तो वेगळा आणि विचित्र पर्याय. तर पर्यायाचा प्रयोग यापूर्वी झालेला आहे. तोही महाराष्ट्रात आणि तोही राजधानी मुंबईत... तर पर्याय असा की राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता स्थापनेचा भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष कुंपणावरून पाहत मजा घेत आहे. तसेच शिवसेनेला पडद्या मागून फूस लावून भाजप विरोधात बोलण्याचे बळ देत आहे. ते बळच काढून घेण्याची रणनिती भाजप आखू शकतो. भाजप हा शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी सांगून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास सांगू शकतो. तसेच या सरकारला बाहेरून पाठिंबा देत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवू शकते. 

तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर शक्य आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४  आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. अशा परिस्थितीत भाजपने सत्तेत सहभागी न होता. शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला आहे.  तर शिवसेनेला चार अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तसेच भाजप डोईजड होऊ नये म्हणून ६ मनसेचे आमदार शिवसेनेने आपल्याकडे वळवले होते. तसेच प्रभाग क्रमांक ३२ च्या काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार गीता भंडारी नगरसेविका झाल्या त्यामुळे आता शिवसेनेचे ९५ नगरसेवक आहेत. 

मुंबई महापालिकेत हे शक्य झाले तर विधानसभेतही शक्य होऊ शकते. मात्र, त्यासाठी भाजपने मोठ्या मनाने शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा देणे गरजचे आहे. पण गेल्या १५ दिवसात मुख्यमंत्रीपदावरून जी रस्सीखेच पाहिली. तर  मात्र हा अत्यंत किचकट आणि धक्कादायक पर्याय असणार आहे. हा फक्त बातम्यांमध्ये चर्चिला जाऊ शकतो. पण प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी होणे अवघडच नाही तर अशक्यही वाटत आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...