कोंडी फोडण्याच्या भाजपच्या निर्णयावर राऊतांचा आक्रमक पवित्रा 

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 16:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी भाजपने पुढाकार घेत शिवसेनेला मसुदा तयार करण्याचे काम सुरू असल्याची बातमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रिपदावर बोला. 

vidhansabha election 2019 CM post sanjay raut  devendra fadanvis proposal news in marathi
कोंडी फोडण्याच्या भाजपच्या निर्णयावर राऊतांचा आक्रमक पवित्रा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सत्ता कोंडी सुटण्याची बातमी संजय राऊतांनी केली 'कील'
  • भाजपकडून एक मसुदा तयार करण्यात येणार असल्याची माहिती
  • राऊतांनी फेटाळला सर्व मसुदा, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी भाजपने पुढाकार घेत शिवसेनेला मसुदा तयार करण्याचे काम सुरू असल्याची बातमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रिपदावर बोला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारीक कार्यक्रमात म्हटले होते की, जे काही ठरलं होते की, त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलं नव्हते.  मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले होते.  उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्र्याचे ते वक्तव्य माघारी घेण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात येणार आहे. 

या संदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, मसुद्याबाबत आम्हांला माहिती नाही. मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रिपदाबाबत बोला. मगच चर्चा होईल. ते पद देत असतील तर आम्ही चर्चा करू असे म्हणून जी सत्ता संघर्षाची कोंडी फुटण्याची चिन्ह असणारी बातमी संजय राऊत निष्प्रभ करू टाकली. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर कायम ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत मुसद्यात उल्लेख नसेल कर भाजपकडून आलेला कोणताही फोन घेतला जाणार नाही. असे मातोश्रीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...