राहुल गांधी कुठे आहे, विरोधकांच्या प्रश्नाला काँग्रेसला सापडलं उत्तर 

मुंबई
Updated Oct 09, 2019 | 20:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीत कुठे गेले असा प्रश्न विरोध विचारत असताना आता त्याचे उत्तर काँग्रेस पक्षाला मिळाले आहे.

vidhansabha election 2019 congress rahul gandhi election campaign in maharashtra news in marathi
राहुल गांधी कुठे आहे, विरोधकांच्या प्रश्नाला काँग्रेसला सापडलं उत्तर  

थोडं पण कामाचं

  • राहुल गांधीचा महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला
  • येत्या १३ आणि १६ तारखेला महाराष्ट्रात घेणार सभा
  • लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी महाराष्ट्रात घेणार सभा

मुंबई :  काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीत कुठे गेले असा प्रश्न विरोध विचारत असताना आता त्याचे उत्तर काँग्रेस पक्षाला मिळाले आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर बँकॉकला रवाना झाले होते. त्यामुळे विरोधाकांच्या हाती आयते कोल्हीत मिळाले होते. त्यावरून भाजप आणि सेनेने काँग्रेसला घेरण्याची रणनिती आखली होती. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी १३ आणि १६ ऑक्टोबरला महाराष्ट्रात काँग्रेसची आघाडीसाठी सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. 

राहुल गांधी यांनी पराभव मान्य केला असून ते निवडणुकीची धामधुम सुरू असताना बँकॉकला गेले असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथील सभेत केला. तसेच विरोधी पक्ष काँग्रेसला घेरण्याची या मुद्द्यावरून रणनिती आखत होते. पण आता या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र काँग्रेसला मिळाले असून राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

राहुल गांधी यांची एक सभा मुंबईत होणार आहे. तर दुसऱ्या सभेचे ठिकाण अजूनही ठरलेले नाही. दरम्यान, या सभेत राहुल गांधी आपली भूमिका मांडणार आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पहिलीच निवडणूक महाराष्ट्र आणि हरियाणात होत आहे. त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देखील एक दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून शरद पवार यांच्या सोबत महाआघाडीच्या संयुक्त सभेत त्या भाषण करणार असल्याचेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे.  राहुल गांधी परदेशातून मायदेशी आले आहेत, अशी माहिती मला मिळाली असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...