मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज (१७ ऑक्टोबर) दोन सभा आयोजित करण्या आल्या होत्या. पहिली सभा प्रभादेवी तर दुसरी सभा लालबाग येथे होती. मुंबईतील या दोन्ही सभेत राज ठाकरेंनी सरकार जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून निसटत चालली असल्याचं वक्तव्य देखील केलं. 'जगातल्या युद्धांचा इतिहास सांगतो की युद्ध जमिनीच्या मालकीसाठी झाली आहेत. आज आपल्या हातातून आपली मुंबई निसटत चालली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आपण आपलीच मुंबई मिळवली होती. त्यामुळे आपली मुंबई आपल्या हातातून निसटू देऊ नका.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
याचवेळी राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत देखील जोरदार टीका केली. 'बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचाच डाव आहे.' असा थेट आरोप राज ठाकरेंनी सरकारवर केला आहे. 'मुंबईहून २ तासात अहमदाबादला जाऊन आपल्याला नेमकं काय करायचं आहे? त्यामुळे ह्या बुलेट ट्रेनचा भौगोलिक अंदाज घ्या तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेनच्या नावाखाली मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.' असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी लालबाग येथील सभेत देखील केंद्र सरकारवर आर्थिक मंदीवरुन जोरदार टीका केली. राज्यातील तरुणांच्या नोकऱ्या जात असल्याचंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसंच मोदींनी केलेली नोटाबंदी देखील फसली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
पाहा राज ठाकरे यांच्या लालबाग येथील सभेतील काही महत्त्वाचे मुद्दे:
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.