वरळीत आदित्य विरोधात का दिला नाही, उमेदवार पहिल्यांदा बोलले राज ठाकरे, हे आहे कारण... 

मुंबई
Updated Oct 14, 2019 | 20:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळीत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध मनसेने उमेदवार का दिला नाही याचे पहिल्यांदा उत्तर राज ठाकरे यांनी दिले आहे. 

vidhansabha election 2019 raj thackeray mns aditya thackeray shiv sena worli assembly constituency news in marathi
वरळीत का दिला नाही, उमेदवार पहिल्यांदा बोलले राज ठाकरे 

मुंबई :   विधानसभेच्या रणांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले १०४ उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपला उमेदवार दिला नाही, या बाबत गेल्या अनेक दिवसांपासून तर्क वितर्क लढविले जात होते. पण स्वतः राज ठाकरे यांनी आपण या ठिकाणी उमेदवार का दिला नाही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांना वरळीत उमेदवारी दिली का दिली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, राजकारण हे एका बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला. त्यामुळे माझ्या कुटुंबातील एक मुलगा पहिल्यांदा निवडणुकीला उभा आहे. तर एक काका म्हणून मी त्या ठिकाणी माझा उमेदवार दिला नाही. मी काय केले आणि त्यांनी माझ्या या कृतीला कसे घेतले हे मी सांगू शकत नाही. मी माझे काम केले. राजकारण यात आणले नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवत होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उमेदवार दिला नव्हता. पण यंदा शरद पवार यांनी आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना तसा विचार केला नाही. कोण बरोबर पवार काका की ठाकरे काका? यावर राज ठाकरे हा प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. त्यावर मी काही बोलणार मी माझी जबाबदारी पार पाडली. वरळीत मी उमेदवार दिला नाही. 

आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवित आहेत, तुम्ही कसे पाहतात, यावर राज ठाकरे म्हणाले, आता आम्ही बाळासाहेबांच्या विचारात वाढलो आहोत. पण नव्या पिढीला वाटतंय निवडणूक लढायची तर तो त्यांचा निर्णय आहे. हा त्यांचा विचार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी