ब्ल्यू फिल्म काढली असती तरी परवडलं असतं : राज ठाकरे 

मुंबई
Updated Oct 10, 2019 | 21:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्राची विकासाची ब्ल्यू प्रिंट देणारा पक्ष आहे. मी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट देण्याची घोषणा केली होती.

vidhansabha election 2019 raj thackeray mns blue print and blue film news in marathi
ब्लू फिल्म काढली असती तरी परवडलं असतं : राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: फेसबुक

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्राची विकासाची ब्ल्यू प्रिंट देणारा पक्ष आहे. मी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मी जो पर्यंत ब्ल्यू प्रिंट सादर केली नाही, तो पर्यंत सर्व पत्रकार मला विचारत होते कुठे आहे ब्ल्यू प्रिंट, कुठे आहे ब्ल्यू प्रिंट... मग मी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणली तेव्हा एकाही पत्रकाराने ती पाहिली नाही. त्यात काय आहे, काय मुद्दे आहेत. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी मला एक पत्रकार भेटला तो आज या सभेत पण आहे. मला विचारले कुठे आहे तुमच्या ब्ल्यू फिल्मचे काय झाले.... ब्ल्यू फिल्म? यावर काय बोलायचे?  मग वाटलं त्यावेळी ब्ल्यू प्रिंट ऐवजी ब्ल्यू फिल्म काढली असती तर बरं झालं असत, लोकांनी पाहिली तरी असती आणि पत्रकारांनीही वारंवार पाहिली असती, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील सभेत लावला. 

राज ठाकरे यांच्या आज मुंबईत दोन सभा झाल्या. त्यातील पहिली सभाही सांताक्रुझ येथे झाली तर दुसऱी सभा ही गोरेगाव येथे झाली. त्यातील गोरेगाव येथील सभेत राज ठाकरे यांनी ब्ल्यू प्रिंटची आठवण काढली. 

राज ठाकरे यांनी त्या संबंधीत पत्रकाराला म्हटले, आता तुझ्यावर शिक्का बसला की हा ब्ल्यू फिल्म पाहतो आणि त्याबद्दल विचारतोही.  राज ठाकरे यांनी यावेळी या सभेत भाजप आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.  तसेच आपल्या ईडी चौकशी, आरे, शहरातील खड्डे, वाहतूक समस्या, बोरिवली नॅशनल पार्क, युती, सेना मंत्र्यांचे राजीनामे, उद्धव ठाकरे यांच्या युती सडल्यावर भाष्य यावर आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी