लाव रे व्हिडिओ' पार्ट २ वर असं बोलले राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीवेळी  सत्ताधारी भाजप-सेनेच्या उमेदवारांची आणि नेत्यांची झोप उडविणाऱ्या 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट टू होऊ शकतो, असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहे. 

vidhansabha election 2019 raj thackeray mns lav re to video part 2 news in marathi
'लाव रे व्हिडिओ' पार्ट टू होऊ शकतो, राज ठाकरेंनी दिले संकेत 

मुंबई :  लोकसभा निवडणुकीवेळी 'लाव रे तो व्हिडिओ' या आपल्या वेगळ्या प्रचार तंत्रामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पाच दिवसात लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट टू आणू शकतात, असे संकेत स्वतः राज ठाकरे यांनी दिले आहेत. 

एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी लाव रे तो व्हिडिओ या प्रचार तंत्रामुळे सत्ताधारी भाजप सेनेच्या उमेदवारांची आणि नेत्यांची झोप उडाली होती. तसेच राज ठाकरे यांचे प्रचार तंत्र लोकांनाही आवडले होते. त्यामुळे अशा प्रचार तंत्राचा वापर अद्याप राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी केलेला नाही. या संदर्भात विचारणा केली असता राज ठाकरे यांनी सांगितले की, प्रत्येकवेळी तेच शस्त्र काढायचं नसतं, लोकं विचार करत असतात त्या पेक्षा तिसरं काही तरी काढायचं असतं. 

लोकसभेवेळी मोदी बऱ्या ठिकाणी बोलू ठेवले होते. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ खूप उपलब्ध होते. त्यामुळे त्यांचा लाव रे तो व्हिडिओ करता आला. फडणवीस ही बोलले आहेत. आगामी काळात अजून ७-८ आठ दिवस बाकी आहेत. त्यामुळे तुम्हांला लाव रे तो व्हिडिओ पाहयाला मिळू शकते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे यांना लाव रे तो व्हिडिओमुळे ईडीची नोटीस आली का असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, याचा काय संबंध नाही. मी काही कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. माझा हात जर दगडाखाली असता तर त्यांना अंगावर घेतले नसते.  मी अशा चौकशांना मी घाबरली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी