[video] राज ठाकरेंनी महापौर महाडेश्वर यांच्यावर केली ठाकरे शैलीत टीका

मुंबई
Updated Oct 10, 2019 | 20:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांतक्रूज येथील पहिल्या सभेत महायुतीच्या उमेदवार आपल्या ठाकरे शैलीत टीका केली.  वांद्रे पूर्व मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून महापौर विश्वन

vidhansabha election 2019 raj thackeray mns shiv sena vishwanath mahadeswar news in marathi
[video] राज ठाकरेंनी केली महापौरांवर ठाकरी टीका  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर टीका
  • मनसेकडून अखिल चित्रे वांद्रे पूर्वमधून निवडणूक रिंगणात
  • वांद्रे पूर्वमध्ये तिरंगी लढत, मनसे, सेना आणि सेना बंडखोराचा सामना

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांतक्रूज येथील पहिल्या सभेत महायुतीच्या उमेदवार आपल्या ठाकरे शैलीत टीका केली.  वांद्रे पूर्व मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर उभे आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची संधी यावेळी राज ठाकरे यांनी सोडली नाही. 

यावेळी वांद्रे पूर्व येथील मनसेचे उमेदवार अखिल चित्रे यांना उभे केल्यावर राज ठाकरे म्हणाले, याच्याकडे पाहून घ्या, संपूर्ण दाढी वाढविली आहे. उगाच बुटाची पॉलिश लावल्यासारखी दाढी याने वाढवली नाही आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव न घेता केली. राज ठाकरे म्हणाले, हा उमेदवार उभा आहे, त्याच्या पोटात आग आहे. तुमचे प्रश्न मांडण्याची, विधानसभेत तुम्हाला न्याय हक्क मिळवून देण्याची धमक त्याच्यामध्ये आहेत. मी जे काही पक्षातर्फे उमेदवार उभे केले आहेत. त्या प्रत्येकाच्या आत आग आहे या सरकारला जाब विचारण्याची येवढ्यासाठी मी या ठिकाणी आलोय, या उमेदवाराला विजयी करा आणि सक्षम विरोधी पक्षाचा आमदार द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची तांत्रिक दृष्ट्या दुसरी आणि राज ठाकरे बोलले अशी पहिली सभा सांताक्रूझ येथे झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मतदारांकडे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक हाती सत्ता न मागता विरोधी पक्षाचा 'पत्ता' मागितला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मी सत्ता मागणार नाही. पण जेव्हा माझ्या दृष्टीक्षेपात सत्ता येईल तीही मागेल असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

सध्या शहरांची वाताहत झाली आहे. तुमचे प्रश्न मांडणारा विरोधीपक्षच सभागृहात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मला विरोधी बाकावर बसण्याची संधी द्यावी अशी मागणी सांताक्रुजच्या सभेत केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...