मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, उद्धव ठाकरे यांनीही हे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिवसेनेने करावे अशी कोटी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले आम्ही पण अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आपले मानतो. त्यामुळे ते उद्या शिवसेनेत दाखल होतील का, असा प्रति प्रश्न मुनगंटीवार यांनी केला आहे.
शिवसेनेचा आग्रह मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा हवा, यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला शिवसैनिकच समजतात. त्याचा समाचार घेत राऊत म्हणाले, असे बोलल्याने कोणी शिवसैनिक होत नाही. शिवसैनिक खोटं बोलत नाही. शिवसैनिक दिलेला शब्द पाळतो, प्राण जाये पर वचन न जाये, अशी त्यांची भूमिका असते. शिवसैनिक सत्याच्या मार्गावर जातो. खोटं बोलून सत्तेच्या पदावर जात नाही. जर कोणी स्वतःला शिवसैनिक समजत असले तर त्यांनी शिवसैनिकांचे संस्कार अंगिकारले पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि त्यांना शिवसैनिक म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.
उद्धव ठाकरेंनी म्हटले की आमच्याकडे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. तर ते काय शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का. हे पहा अशा प्रकारच्या उपमा आणि अलंकार वापरून राजकारण होत नाही. शिवसैनिक कोण आणि शिवसैनिक कसा हे आम्हांला ठाऊक आहे, असेही राऊत म्हणाले.