सुधीर मुनगंटीवार कोणती देणार गोड बातमी, राऊतांनी केली उघड 

मुंबई
Updated Nov 06, 2019 | 19:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ वारंवार माध्यमांना गोड बातमी मिळेले... गोड बातमी मिळेल असे सांगत आहेत तर ती गोड बातमी ही राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल हीच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

vidhansabha election 2019 sanjay raut shiv sena bjp sudhir mungantiwar maharashtra govt formation in marathi
सुधीर मुनगंटीवार कोणती देणार गोड बातमी, राऊतांनी केली उघड   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • संजय राऊतांनी मुनगंटीवार यांच्या गोड बातमीवर केली कोटी
  • शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम
  • शिवसेनेला पाठिंबा देण्यास उत्सुक असणाऱ्या काँग्रेस आमदारांचे राऊतांनी केले कौतुक

मुंबई :  राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ वारंवार माध्यमांना गोड बातमी मिळेले... गोड बातमी मिळेल असे सांगत आहेत तर ती गोड बातमी स्वतः सुधीर मुनगंटीवारच देतील की राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल हीच असल्याचे म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह कायम असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे मांडले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांची ही गोड बातमी, संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत 'कडू' केली आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना  सांगितले की मी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी जाणार आहोत. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, राज्यपालांना आम्ही भेटलो, इतर पक्षही भेटले, राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी भेटायला पाहिजे. उद्या राज्यपालांना भेटून ते जर सरकार स्थापनेचा दावा करत असतील तर आमचीही हीच मागणी होती. उद्या भाजप नेते भेटल्यावर ते काय भूमिका घेतात हे कळेल, असे राऊत यांनी सांगितले. 

अवकाळी पावसाच्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे यांना काही प्रस्ताव पाठविण्यात आला का, या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, की मला या संदर्भात काही माहिती नाही. मी तुमच्याशी बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यामुळे असा प्रस्ताव असल्याचे त्यांनी मला काही माहिती दिली नाही. त्यामुळे ही माहिती चुकीची आहे. 

राज्यात भाजपचे सरकार येऊ नये अशी काँग्रेसच्या तरूण आमदारांची भावना आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या. त्यांचे मी कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांच्या जशा भावना आहेत, तशाच महाराष्ट्राच्या जनतेच्या आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी