राजकीय घडामोडींवर 'नजर' ठेवण्यासाठी शरद पवार मुंबईत दाखल 

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 14:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

विधानसभा भंग होण्यासाठी काही तास शिल्लक असताना सर्व राजकीय घडामोडींवर जवळून नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले.

vidhansabha election 2019 sharad pawar in mumbai govt formation news in marathi
राजकीय घडामोडींवर 'नजर' ठेवण्यासाठी शरद पवार मुंबईत दाखल   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोकणाचा दौरा रद्द करून शरद पवार मुंबईत दाखल
  • कराडचा दौरा संपवून शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल
  • राजकीय घडामोडींवर शरद पवारांची बारीक नजर

मुंबई : विधानसभा भंग होण्यासाठी काही तास शिल्लक असताना सर्व राजकीय घडामोडींवर जवळून नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले. कराड येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या दौरा संपवून शरद पवार मुंबईत आपल्या सिल्वर ओक या निवास स्थानी दाखल झाले आहे. 

राज्यात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडी फार वेगाने घडत आहेत. भाजपकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना संपर्क साधण्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. तसेच आपले आमदार फुटून नये म्हणून सर्व पक्ष दक्षता घेताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या ५४ आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. भाजप काय भूमिका घेते याकडे शरद पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे भाजपने घेतल्या भूमिकेनंतर काय डावपेच खेळायचे यावर लवकरच एक बैठक शरद पवार घेणार आहेत. 

दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सिल्वर ओक बंगल्यावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेते थोड्या वेळातच पवारांसोबत बैठकीसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात घोडेबाजार सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांना भाजपकडून संपर्क साधण्यात येत आहे. पण आमचा एकही आमदार फुटणार नाही, असे ठाम मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. आमच्या पक्षात फुटून जाणारे यापूर्वीच दुसऱ्या पक्षात गेले आहेत. आता कोणीही फुटणार नाही जर कोणी फुटण्याचा प्रयत्न केला तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्या आमदाराला पाडण्याची रणनिती सर्व पक्षांनी केली असल्याचे जयंत पाटील सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी