फेरनिवडणुकीवर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 18:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यात सद्यस्थिती पाहता राज्यात लगेचच फेर निवडणुका होणार नाही, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. आगामी काळात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे.

vidhansabha election 2019 sharad pawar ramdas athavle ncp shiv sena news in marathi google newsstand
फेरनिवडणुकीवर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : राज्यातील सद्यस्थिती पाहता राज्यात लगेचच फेर निवडणुका होणार नाही, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. आगामी काळात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे. 

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज दुपारी शरद पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी रामदास आठवले आणि शरद पवार हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले,  राज्यात झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी रामदास आठवले  माझ्याकडे आले होते. या प्रकरणी रामदास आठवले यांनी भाजप आणि सेनेत समन्वयासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील स्थिती दुरुस्त व्हावी, याची चिंता रामदास आठवलेंना आहे. ते दोन्ही पक्षांना सल्ला देऊ शकतात. त्यामुळे त्यांचे एकमत व्हावे. जनतेने त्या दोघांना बहुमत दिले आहे. त्यामुळे त्यांनी सरकार बनवावे, महाराष्टराला स्थीरता द्यावी, असा मी सल्ला रामदास आठवले यांना दिला आहे. 

पवारांनी राज्याच्या स्थितीवर अभ्यास करत असल्याचे सांगितले, मी कर्नाटकमधील स्थितीचा अभ्यास केला. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांना राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर कोर्टाने ही मुदत कमी केली होती.  पण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील स्थिती वेगळी आहे. राज्यात भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत आहे. दोघांनी सामंज्सपणा दाखवावा आणि दावा दाखल करावा. राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण द्यावे, असेही पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी