[VIDEO] संजय राऊतांनी भाजपला दिले पुन्हा चॅलेंज 

शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. पत्रकारांनी हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे की तुम्ही कायम आपल्या भूमिकेवर ठाम असतात का, भाजप हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे

vidhansabha election 2019 shiv sena sanjay raut press conference lashout on bjp maharashtra govt formation  news in marathi
संजय राऊतांनी भाजपला दिले पुन्हा चॅलेंज   |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई : शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. पत्रकारांनी हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे की तुम्ही कायम आपल्या भूमिकेवर ठाम असतात का, भाजप हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडे १४५ हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी सत्ता स्थापन करावी, नसेल तर त्यांनी आम्ही सत्ता स्थापन करत नाही तसे जाहीर करावे, असा चॅलेंज देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने विनाकारण राज्यात राष्ट्रपती राजवटीचा पेच निर्माण करून नये असा आरोप केला आहे. 

शिवसेना आमदारांची आज सकाळी मातोश्री या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती देण्यासाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आज महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या शिवसेना आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच एकमताने विश्वास दिला की तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हांला मान्य आहे. 

यापुढे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की युती तोडण्याचे पाप मी करणार नाही. २४ तारखेला निकाल लागला त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी हेच सांगितले. विधीमंडळ पक्षनेतेपदाची निवडणूक झाली, त्यावेळीही आमदारांच्या बैठकीवेळीही हेच सांगितले आणि आजच्या बैठकीत हेच सांगितले. माझ्याकडून युती तुटेल असे पाप मी करणार नाही. तसेच दुसरा पर्याय उपलब्ध असेल तर तो निवडण्याचे पापही मी करणार नाही. 

राजभवनाबाहेर चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद मी ऐकल्याचे संजय राऊत यांनी सांगितले, त्यावर ते म्हणाले,  महाराष्ट्राचा कौल महायुतीला केला आहे, असे ते वारंवार म्हणताहेत तर मग सरकार स्थापन करण्याचा दावा का करत नाही. राज्यपालांना भेटून ते रिकाम्या हाती का परतले. राज्यातील जनतेला केवळ महायुतीला नाही. तर भाजप आणि शिवसेनेत जे ठरलं होतं. ज्या गोष्टी जनतेसमोर आल्या होत्या. त्या ठरलेल्याला ग्राह्य धरू लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कौल दिला आहे. हे भाजप विसरले आहे.  

साम, दाम, दंड, भेद याला शिवसेना घाबरत नाही. हे आमचे सूत्र आहे. त्यांनी कधी घेतले. असा प्रति सवाल राऊत यांनी पत्रकारांना केला. जो पर्यंत खुर्ची आहे तो पर्यंत चालतो. खुर्ची गेल्यावर सर्व अलंकार गळून पडतात, असेही राऊत यांनी सांगितले. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी