राजकारणाला वेगळं वळण : भाजपने दिला काँग्रेसला ४८ तासांचा अल्टीमेटम

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

 भाजपच्या कोणत्याही नेत्याने महाराष्ट्रातील आमदाराला खरेदी विक्री संदर्भात फोन केलेला नाही. जर काँग्रेसकडे अशा प्रकारचे फोन रेकॉर्डिंग असेल तर त्यांनी येत्या ४८ तासात महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवाव्यात

vidhansabha election 2019 sudhir mungantiwar bjp congress horse trading need  evidence ultimatum news in marathi
राजकारणाला वेगळं वळण : भाजपने दिला काँग्रेसला ४८ तासांचा अल्टीमेटम  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : भाजपच्या कोणत्याही नेत्याने महाराष्ट्रातील आमदाराला खरेदी विक्री संदर्भात फोन केलेला नाही. जर काँग्रेसकडे अशा प्रकारचे फोन रेकॉर्डिंग असेल तर त्यांनी येत्या ४८ तासात महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवाव्यात, त्यांच्याकडे पुरावे नसतील तर काँग्रेसने महाराष्ट्राच्या जनतेची आणि काँग्रेस ज्या आपल्या आमदारावर अविश्वास दाखवला आहे. त्याची माफी मागावी, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक होऊन प्रतिक्रिया दिली. 

पुरावे असतील तर ते येत्या ४८ तासात सादर करावे, असा अल्टीमेटम मुनगंटीवार यांनी भाजपला दिला आहे.  भाजपच्या कोणत्याही नेत्याने महाराष्ट्रातील कोणत्याही आमदाराला फोडाफोडीसाठी संपर्क केलेला नाही. भाजपाची लढाई विचारांची आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

काँग्रसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपच्या काही मध्यस्थांनी फोन करून आमिष दाखवले असल्याचे आरोप काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केला होता. तसेच आमदार हिरामण खोसकर यांनीही या आरोपाला दुजोरा दिला होता. त्यामुळे या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. 

शिवसेनेचे आमदार हे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित आहेत. त्यामुळे ते फुटणार नाही हे माहिती असताना त्यांनी सर्व आमदारांना एका ठिकाणी का ठेवले. त्यांना काय भीती वाटते आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. 

नितीन गडकरी मुंबईत दाखल झाले आहेत. ते मातोश्रीवर जाणार आहेत का, ते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत का, असे पत्रकारांनी विचारले असता, मुनंगटीवार म्हणाले की, मी बोलतो आहे. भाजपचे नेते चर्चा करत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. 

शिवसेना आणि भाजप यांच्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. शिवसेना एका प्रस्तावावर आग्रही आहे. कोंडी फुटले आणि परिस्थिती सामान्य होईल आणि महायुतीचे सरकार स्थापन होईल असा पुन्हा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी