शिवसेनेशी मनोमिलन २४ सेकंदात शक्य - मुनगंटीवार 

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 21:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्या या संदर्भात भाजपची कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

vidhansabha election 2019 sudhir mungantiwar bjp shiv sena uddhav thackeray govt formation maharashtra news in marathi
शिवसेनेशी मनोमिलन २४ सेकंदात शक्य - मुनगंटीवार   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्या या संदर्भात भाजपची कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा याच्यावर चर्चा करणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

आमची भूमिका स्पष्ट आहे, जनादेश आहे भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांना आहे. शिवसेनेने आमच्यासोबत जी काय चर्चा बंद केली ती सुरू करावी आणि जनादेशाचा सन्मान करावा ही अपेक्षा आमची पहिल्याापासून राहिलेली आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

उद्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे, आम्ही संर्वंकष चर्चा करणार आहोत. शिवसेनेशी एकजूट ही २४ सेकंदात होऊ शकते. शिवसेनेने मतरुपी जनादेशाचा सन्मान करत चर्चा करावी. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की २४ तास आमची चर्चा करण्याची तयारी आहे. युती आजही आमची कायम आहे. त्यामुळेच केंद्राच्या मंत्रीमंडळात आजही शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे आमचा प्रेमाचा संबंध कुठेही तुटलेला नाही. जो काही आग्रह आहे, या संदर्भात शिवसेनेने फेर विचार करावा अशी भाजपची अपेक्षा असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा झाल्या त्यानंतर भाजपकडून शिवसेनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, आमच्या विविध स्तरावर चर्चा सुरूच असतात. पण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...