राज्यातील प्रत्येक वाघाचे संरक्षण आणि संवर्धन होणार : मुनगंटीवार 

राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपकडून सावध भूमिका घेतली जात असताना शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

vidhansabha election 2019 sudhir mungantiwar shiv sena tiger rescue news in marathi
राज्यातील प्रत्येक वाघाचे संरक्षण आणि संवर्धन होणार : मुनगंटीवार   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपकडून सावध भूमिका घेतली जात असताना शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुनगंटीवार बोलत होते. 

या बैठकीला पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर तब्बल १४ दिवसांनंतर आले होते. त्या बैठकीनंतर माध्यमांनी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला की, चंद्रपुरात एक वाघ अडकला आहे. येथे शिवसेनेचा वाघ गुरगुरत आहे. त्यामुळे सेनेच्या वाघामुळे खऱ्या वाघाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरातील वाघ असो वा राज्यातील कोणताही वाघ असो त्या वाघाचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे तसे आम्ही करणार आहोत, असे म्हणून शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची संकेत मुनगंटीवार यांनी दिले. 

आढावा बैठकीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, या बैठकीचा केंद्र बिंदू हा शेतकरी होता. त्याव्यतिरिक्त कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सर्वात प्रथम शेतकऱ्याला मदत देणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे ते करण्यासाठी आजची बैठक आहे. भविष्यात लवकरच सत्ता स्थापनेसंदर्भात गोड बातमी येईल, जे कोणी लिहून ठेवले आहे की सब्र का फल मिठा होता आहे. त्याने वाट पाहण्याचा सल्ला दिला हे विसरून चालता कामा नये, असेही माध्यमांना सल्ला मुनगंटीवार यांनी दिला आहे. 

सेना भाजप पाण्यासारखे

कोणी कितीही पाणी वेगळं करण्याचे प्रयत्न केला तरी ते एकत्र येतेच, तसे भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आजही भाजप आणि सेनेचे मंत्री हे वेगवेगळे वाटत नव्हते. एकच असल्याचे बैठकीत वाटत होते, मुनंगटीवार यांनी सांगितले. 

राऊत पवार भेट... 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. अनेक नेते अनेक नेत्यांना दररोज भेटत असतात. माझेही अनेक नेत्यांशी दररोज संभाषण होत असते. त्यामुळे प्रत्येकवेळी चर्चा ही राजकीयच असेल असे नाही. त्यामुळे पवारांशी इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी राऊत गेले असतील असे म्हणून राऊत पवार भेटीवर मुनगंटीवार यांनी राजकीय भाष्य करणे टाळले. 

गोड बातमी मिळेल... 

आज झालेल्या आढावा बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली नाही. सत्ता स्थापनेला मुदत आहे.  गोड बातमी कधीही येऊ शकते. असे म्हणून शिवसेना पाठिंबा देऊ शकते असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी