उद्धव ठाकरेंनी केली राज ठाकरेंची कॉपी

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 19:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असताना शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ' लाव रे तो व्हिडिओ' या स्ट

vidhansabha election 2019 uddhav thackeray raj thackeray dushyant chautala news in marathi
उद्धव ठाकरेंनी केली राज ठाकरेंची कॉपी  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असताना शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ' लाव रे तो व्हिडिओ' या स्टाइलची कॉपी केली आहे. 

शिवसेनेकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर सामनातून खालच्या स्तरांवर जाऊन टीका केली जाते, हे आम्ही सहन करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता.  त्यावर पुरावे सादर करताना हरियाणाचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि बिश्णोई यांची क्लिप दाखवली. यावेळी 'लाव रे तो व्हिडिओची आठवण संपूर्ण महाराष्ट्राला झाली. 

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या लाव रे तो व्हिडिओमुळे खूप लोकप्रिय झाले होते. राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर लाव रे तो व्हिडिओवरून टीकेची झोड उठवली होती. तसाच प्रकार आज उद्धव ठाकरे यांनी करून भाजप ज्या दुष्यंत चौटालांसोबत हरियाणामध्ये सरकार स्थापन केले आहे. ते मोदींबाबत आणि केंद्र सरकारबाबत किती खालच्या स्तराला जाऊन टीका करतात, हे त्यांना चालते असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 


पाहा काय म्हटले उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत 

 1. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली. 
 2. मुख्यमंत्र्यांनी अचाट काम केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद 
 3. पण आम्ही त्यांच्यासोबत नसतो तर ते अचाट विकासकामं केली असती का? 
 4. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, शब्द दिला म्हणजे दिला. परत घ्यायचा नाही. शब्द देताना लाख वेळा विचार 
 5. माझ्यावर पहिल्यांदा खोटेपणाचा आरोप केला. 
 6. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ घेऊन खोटेपणाचा आरोप केला. मी त्यांना सांगू इच्छितो की, शहा आणि कंपनीने केले 
 7. लोकसभेच्या वेळेस मी दिल्लीला गेलो नाही. ते माझ्याकडे आले होते. 
 8. उपमुख्यमंत्रिपद मिळेल पण मी लाचार नाही. 
 9. मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं 
 10. मला त्यासाठी अमित शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही 
 11. त्यांनी मला फोन केला. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री 
 12. देवेंद्र म्हणाले की, मी अडीच वर्षाचं बोललो तर मी अडचणीत येईल पण मी माझ्या शब्दात बोलतो. शब्दाचे खेळ त्यांनी केली. 
 13. फडणवीस हे चांगले मित्र आहेत. ते होते म्हणून मी पाठिंबा दिला होता. 
 14. पण फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती 
 15. अनौपचारिक चर्चेत फडणवीस जे म्हणाले ते सहन केलं जाऊ शकत नाही
 16. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटा हे मी सहनच करु शकत नाही
 17. शिवसेनेसमोर खोटारडा म्हणून जाऊ शकत नाही 
 18. गेल्या पाच वर्षात अच्छे दिन म्हणून खोटं कोण बोलतं ते जनतेला माहिती आहे. 
 19. आम्ही मोदीजींवर टीका केलेली नाही. मोदी यांनी मला लहान भाऊ म्हटलं आहे. आमच्या या नात्यामुळे जर कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्याचा शोध मोदींनी घ्यावा.  
 20. मला खोटं ठरविणाऱ्या माणसांशी बोलणार नाही 
 21. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत होता का? 
 22. सत्ता स्थापनेचा दावा करावा नाहीतर सर्व पर्याय खुले आहेत. 
 23. नाणारबाबत देखील मुख्यमंत्री खोटं बोलले
 24. राम मंदिर निकालाचं श्रेय कोणत्याही सरकारचं नसेल. ते कोर्टाचं असेल
 25. मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न काळजीवाहूने करु नये 
 26. जे ठरलं ते अमित शहा यांनी मान्य केलं होतं. 
 27. लोकसभेच्या वेळेस जे काही ठरलं होतं त्यापेक्षा मला एक कणही जास्त नको

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...