...तर उद्धव ठाकरेंसाठी हे ५ आमदार देऊ शकतात राजीनामा

 महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

vidhansabha election 2019 uddhav thackeray will contest election from vidhansabha constituency  news in marathi
...तर उद्धव ठाकरेंसाठी हे ५ आमदार देऊ शकतात राजीनामा 

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे, आता मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांना ६ महिन्यात आमदार म्हणून निवडून यावे लागणार आहे.

यासाठी उद्धव ठाकरे विधानसभेची जागा निवडतात की विधान परिषद हे पाहावे लागेल. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोणते आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपली निष्ठा दाखवू शकतात आणि आपल्या पदरात मोठं पद किंवा जबाबदारी पाडून घेऊ शकतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्या देण्यात येऊ शकते. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेताना आपण पाहू शकतो. 

अशा वेळी उद्धव ठाकरे हे विधानसभेतून निवडणूक लढविणे पसंत करू शकतात. जनसामान्यातून निवडून येऊन राज्याचे नेतृत्व करणे त्यांना आवडणार आहे. त्यामुळे ते विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता अधिक आहे. 

यामुळे विधानसभेच्या एका आमदाराला राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंसाठी जागा सोडवी लागणार आहे. त्यामुळे कोण कोण आमदार आहेत. ते राजीनामा देऊ शकतात हे पाहू या. 

अजय चौधरी :  शिवडीचे आमदार अजय चौधरी हे उद्धव ठाकरेंसाठी राजीनामा देऊ शकतात. शिवडी हा शिवसेनेसाठी सेफ मतदार संघ आहे. या ठिकाणी शिवडी मतदार संघाने कायम शिवसेनेला हात दिला आहे. १९८० च्या दशकात काँग्रेसचे दोन आणि २००९ मध्ये मनसेचे बाळा नांदगावकर सोडले तर या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे ही सीट सेफ असू शकते. 

योगेश कदम :  विधानसभेचे आमदार रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम हे पहिल्यांदा विधानसभेवर दापोली मतदार संघातून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे निवडणूक लढवू शकतात. ही सुद्धा शिवसेनेची सेफ सीट मानली जाते. मुलाला तिकीट मिळावे यासाठी रामदास कदम यांनी पुढील सरकारमध्ये मंत्रीपद नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता रामदास कदम यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या मुलाच्या जागी उद्धव ठाकरे निवडणूक लढवू शकतात. 

प्रताप सरनाईक : ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक हे टॉप १५ मतांनी विजयी झाले आहे. या ठिकाणी प्रताप सरनाईक यांना ८४००८ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सेफ मानली जात आहे. 

विश्वनाथ भोईर : कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील शिवसेनेची ताकद पाहता पश्चिम कल्याणमधील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत होऊ पाहणार आहे. 

प्रकाश आबिटकर :  राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्या आमदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्यासाठी देऊ शकतात. कोल्हापुरात महायुतीविरोधात लाट असताना एकमेव शिवसेनेचा आमदार म्हणून प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली होती. आता या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेसचीही साथ मिळणार असल्याने त्यांना ही जागा सेफ असल्याचे म्हटले जात आहे. 

यात कोपरी पाचपाखडीचे आमदार एकनाथ शिंदे हे यंदाच्या निवडणुकीत टॉप १० सर्वाधिक मते मिळविणाऱ्या आमदारांत ९ व्या स्थानी तर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत १० स्थानी आहे. या ठिकाणीही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण या दोनही नेत्यांना मंत्रिपद मिळू शकते त्यामुळे त्यांच्या जागेला धक्का उद्धव ठाकरे लावणार नाही. पण उद्धव ठाकरे बोलले तर हे नेते सुद्धा राजीनामा देऊ शकतात. 

शिवसेनेचे आमदार 


 - चोपडा (एसटी) - शिवसेनेच्या लताबाई सोनवणे विजयी 
- जळगाव ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी 
- एरंडोल - शिवसेनेचे चिमणराव पाटील  विजयी 
- पाचोरा - शिवसेनेचे किशोर पाटील विजयी 
- बुलढाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी 
- मेहकर (एससी) - शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी 
- बाळापूर -शिवसेनेचे नितीनकुमार ताले विजयी 
- दिग्रस - शिवसेनेचे संजय राठोड विजयी
- नांदेड उत्तर - शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी 
- कळमनुरी - शिवसेनेचे संतोष बांगर विजयी 
- परभणी - शिवसेनेचे राहुल पाटील विजयी 
- सिल्लोड - शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी
- औरंगाबाद (मध्य) - शिवसेनचे प्रदीप जैस्वाल विजयी
- औरंगाबाद (पश्चिम) (एससी) - शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी
- पैठण - शिवसेनेचे सांदीपनराव उंबरे विजयी 
- वैजापूर - शिवसेनेचे रमेश बोरनारे विजयी 
- नांदगाव - शिवसेनेचे सुहास कांदे विजयी
- मालेगाव (बाह्य) -  शिवसेनेचे दादा भुसे विजयी 
- पालघर (एसटी) - शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विजयी
- भिवंडी ग्रामीण (एसटी) - शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी 
- कल्याण पश्चिम - शिवसेनेचे विश्वनाथ भोईर विजयी
- अंबरनाथ (एससी) - शिवसेनेचे बालाजी किणीकर विजयी
- ओवला माजिवडा - शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी 
- कोपरी-पाचपाखडी - शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी
- मागाठाणे - शिवसेनेचे प्रकाश बच्छाव विजयी
- विक्रोळी -  शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत विजयी 
- भांडुप वेस्ट - शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी
- जोगेश्वरी पूर्व - शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी 
- दिंडोशी - शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी 
- अंधेरी पूर्व - शिवसेनेचे रमेश लटके विजयी
- चांदिवली - शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी
- कुर्ला (एससी) - शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी 
- कलिना - शिवसेना संजय पोतनीस विजयी
- माहीम - शिवसेनेचे सदा सरवणकर विजय
- वरळी - शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी
- शिवडी - शिवसेनेचे अजय चौधरी विजयी 
- भायखळा - शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी
- कर्जत - शिवसेनेचे महेंद्र थोर विजयी 
- अलिबाग - शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी
- महाड - शिवसेनेचे भारत गोगावले विजयी
- उमरगा (एससी) - शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले विजयी 
- उस्मानाबाद - शिवसेनेचे कैलास पाटील विजयी 
- परांडा - शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी 
- सांगोला - शिवसेनेचे शाहाजी पाटील विजयी 
- कोरेगाव - शिवसेना महेश शिंदे विजयी 
- पाटण- शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी 
 - दापोली - शिवसेनेचे योगेश कदम विजयी 
- गुहागर- शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी
- रत्नागिरी - शिवसेनेचे उदय सामंत विजयी 
- राजापूर - शिवसेना राजन साळवी विजयी 
​​- कुडाळ - शिवसेनेचे वैभव नाईक १४ हजार मतांनी विजयी  
- सावंतवाडी - शिवसेनेचे दीपक केसरकर यांचा विजय
- राधानगरी - शिवसेनेचे प्रकाश अबिटकर विजयी 
- खानापूर - शिवसेनेचे अनिल बाबर विजयी
 
 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी