Vinayak Meteअपघात मृत्यू प्रकरण: लोकांना होता घातपाताचा संशय, पण सीआयडीनं चालकाला का मानलं गुन्हेगार?

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 16, 2022 | 13:50 IST

Vinayak Mete Car Accident : अपघातावर मेटेंच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता. विनायक मेटे यांच्या आईंनी तर आपल्या मुलासोबत घातपात झाला असावा, असा थेट आरोप केला होता. इतकेच नाहीतर राज्यातील चौकाचौकात या अपघातावर चर्चा रंगत होती.

Vinayak Mete Car Accident : ोकांना होता घातपाताचा संशय, पण...
Vinayak Mete Car Accident : लोकांना होता घातपाताचा संशय, पण सीआयडीनं चालकाला का मानलं गुन्हेगार 
थोडं पण कामाचं
  • मेटेंचा चालक एकनाथ कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता त्याला अटक होणार हे निश्चित आहे
  • विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता.
  • राज्य सीआयडीने मेटेंचा चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते (Late leader of Shiv Sangram) विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू (death) प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या  कार चालकाविरोधात (driver)गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये (Rasaani Police Station) चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेटेंचा चालक एकनाथ कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता त्याला अटक होणार हे निश्चित आहे. आज किंवा उद्या त्याला पोलीस ताब्यात घेतील. (Vinayak Mete accident case: People suspected an accident, but why CID considered the driver as the culprit)

अधिक वाचा  : टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वापरून पाहा

कधी झाला होता अपघात 

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर साधरण अर्धा ते पाऊण तासानंतर मेटेकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचाराआधीचं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.  

मेटेंचा अपघात की घातपात 

अपघातावर मेटेंच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता. विनायक मेटे यांच्या आईंनी तर आपल्या मुलासोबत घातपात झाला असावा, असा थेट आरोप केला होता. इतकेच नाहीतर राज्यातील चौकाचौकात या अपघातावर चर्चा रंगत होती. हा घातपात असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. दरम्यान हा अपघात आहे का घातपात याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करण्याचं ठरवलं होतं. 

अधिक वाचा  : कुत्ता गोली: मालेगावातील औषध विक्रेत्यांवर पोलिसांची नजर

 सत्य ते समोर येईल - बावनकुळे 

सर्वत्र संशय वर्तवला जात असताना भाजप नेत्यांकडेही अनेकजण आरोपीच्या नजरेने पाहिलं जात होतं. अशा वातावरणात भाजप नेते बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना विनायकराव मेटे यांच्या कुटुंबाची ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील, असं म्हटलं होतं.  

अधिक वाचा  : जाणून घ्या कधी आमने-सामने येतील भारत आणि न्यूझीलंड संघ

 चालक कसा ठरला गुन्हेगार 

राज्य सीआयडीने मेटेंचा चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  चालकावर 304 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु या गुन्ह्याखाली फकत दोन वर्षाची शिक्षा होत असते. परंतु सीआयडीकडून 304 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला तर मोठी शिक्षा होऊ शकते. कारण अशा प्रकारे कार चालवून अपघात होऊ शकतो आणि यामुळे कारमधील सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्याने वेगात कार चालवली आणि नंतर अपघात झाला. त्यामुळेचं चालक एकनाथ कदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सीआयडीने या अपघात प्रकरणी तपास केला त्यात अनेक निदर्शने नोंदवली असून त्यानुसार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्या ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं. सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात 140 ते 120 च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्याने कार तिथे घातली. आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी