Vinayak Mete accident case cid inquiry: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचं निधन झालं. मात्र, या अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले होते. विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं होतं आणि त्यांच्या समर्थकांसोबतच कुटुंबीयांकडूनही या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात येत होते. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Vinayak Mete accident death case CM Eknath Shinde order CID inquiry read news in marathi)
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम.जी.एम. रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
अधिक वाचा: Vinayak Mete accident: अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत - चालकाचा गंभीर आरोप
विनाक मेटे यांचा हा अपघात आहे की घातपात याबद्दल आपल्यालाही संशय वाटतो अशी प्रतिक्रिया मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी होऊन काय आहे ते सत्य सस्वासमोर यावे असंही त्यांनी म्हटलं होतं.
अधिक वाचा: विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक आणि चालक सापडला
तर दुसरीकडे विनाटक मेटे यांच्या शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर आणि स्थानिक पत्रकार उद्धव मोरे यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये झालेल्या संवादावरुन विनायक मेटे यांचा अपघात करुन आणण्याचा प्रयत्न ३ ऑगस्ट रोजी झाल्याचं म्हटलं आहे. तीन ऑगस्ट रोजी मेटेंच्या गाडीला अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या ऑडिओ क्लिपची पृष्टी कुणीही केलेली नाहीये.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या घटनेनंतर हा अपघात की घातपात अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.