Vinayak Mete accident: अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत - चालकाचा गंभीर आरोप

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 14, 2022 | 08:54 IST

मुंबई- पुणे (Mumbai - Pune) या द्रुतगती महामार्गावर (expressway) भातान बोगद्याजवळ (Bhatan Tunnel) शिवसंग्राम पक्षाचे  (Shiv Sangram Party) नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांच्या कारला भीषण अपघात (accident) झाला असून यात विनायक मेटे याचे निधन झाले आहे.

After the accident, Vinayak Mete did not get help for an hour
अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मेटेंना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करणअयात आले होते.
  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांच्या अपघात झाला.

मुंबई :  मुंबई- पुणे (Mumbai - Pune) या द्रुतगती महामार्गावर (expressway) भातान बोगद्याजवळ (Bhatan Tunnel) शिवसंग्राम पक्षाचे  (Shiv Sangram Party) नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांच्या कारला भीषण अपघात (accident) झाला असून यात विनायक मेटे याचे निधन झाले आहे. विनायक मेटे हे बीडकडून मुंबईकडे येत होते. अपघात झाल्यानंतर मेटेंना  पनवेलच्या (Panvel) एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) दाखल करणअयात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. हा अपघात इतका भीषण होता की, मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे दाबल्या गेली आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच भाजप पनवेलचे नेते आमदार प्रशांत ठाकूर रुग्णालयात पोहोचले होते. या दरम्यान मेटेंच्या कार चालकाने गंभीर आरोप केले आहेत. राम  ढोबळे पोलीस बॉडीगार्ड गंभीर जखमी आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांच्या अपघात झाला.

Read Also : कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर

यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचे चालक एकनाथ कदम  यांनी केला आहे. बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. अपघातानंतर आम्हाला तासभर मदत मिळाली नाही. चालक कदम म्हणाले की,  मदत मिळावी म्हणून रस्त्यावर झोपलो होतो.  परंतु मदत मिळत नव्हती. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही.  

Read Also : उद्धव ठाकरेंच्या त्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर

आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका एका टेम्पो चालकाने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे.

मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हालचाल करू लागली. चालक एकनाथ कदम यांना मुका मार लागला आहे, तर गार्ड जखमी झाले आहेत. एअर बॅगमुळे आम्ही वाचलो असल्याचं कदम म्हणाले आहेत.  

कोण होते विनायक मेटे

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. 
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी