Fact Check : मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात कुराणातील आयत वाचून? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड दिसत आहेत. साहित्य संमेलनाची सुरूवात कुरणातील आयत वाचून सुरू केल्याचा दावा या सोशल मीडियातून करण्यात आला आहे. viral photo of surpiya sule and jitendra awhad kuran prayer in marathi sahitya sammelan fake

supriya sule and jitendra awhad
सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
  • साहित्य संमेलनाची सुरूवात कुरणातील आयत वाचून सुरू केल्याचा दावा या सोशल मीडियातून करण्यात आला आहे.
  • भाजपचे माजी खासदार हरीओम पांडे यांनी ७ डिसेंबर रोजी हा फोटो पोस्ट करून हा दावा केला होता.

Fact Check : मुंबई : नाशिक येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलन पार पाडले. यावेळी गिरीष कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही कुबेर यांनी संमेलनात आपले भाषण पूर्ण केले. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड दिसत आहेत. साहित्य संमेलनाची सुरूवात कुरणातील आयत वाचून सुरू केल्याचा दावा या सोशल मीडियातून करण्यात आला आहे.

viral photo of surpiya sule and jitendra awhad kuran prayer in marathi sahitya sammelan fake

भाजपचे माजी खासदार हरीओम पांडे यांनी ७ डिसेंबर रोजी हा फोटो पोस्ट करून “यह महाराष्ट्र सरकार ने नई प्रथा शुरू की है पहले साहित्य सम्मेलन की शुरुआत सरस्वती वंदना से होती थी अब साहित्य सम्मेलन की शुरुआत कुरान की आयतें पढ़कर होती हैं” अशी कॅप्शन दिली होती.

नंतर काही ट्विटर युजरने अशीच कॅप्शन आणि फोटो शेअर करून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

परंतु हा दावा खोटा असल्याचा समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शमीम खान यांच्या मुलाच्या लग्नाला सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली होती. तेव्हा लग्नात मुस्लिम धर्मानुसार प्रार्थना करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड प्रार्थना करताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांनी या लग्नाचे फेसबुक लाईव्हही केले होते.

 
Posted by Supriya Sule on Saturday, December 4, 2021

हा फोटो साहित्य संमेलनाचा नसून एका लग्नाचा आहे. तसेच हा दावा खोटा असल्याचा समोर आले आहे.  भाजपचे माजी खासदार हरीओम पांडे यांनी हा फोटो नंतर डीलीट केला होता. तरी काहींच्या ट्विटर प्रोफाईलवर हा फोटो अजूनही दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी