राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2021 | 17:30 IST

Vision day week in Maharashtra महाराष्ट्रात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करतात. यंदा गुरुवार १० जून २०२१ पासून बुधवार १६ जून २०२१ पर्यंत महाराष्ट्रात दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार.

Vision day week in Maharashtra
राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार 

थोडं पण कामाचं

  • राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार
  • गुरुवार १० जून २०२१ पासून बुधवार १६ जून २०२१ पर्यंत महाराष्ट्रात दृष्टी दिन सप्ताह
  • दृष्टी दिन सप्ताहात राज्यात म्युकरमायकोसिस संदर्भात जनजागृती केली जाईल

मुंबईः महाराष्ट्रात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करतात. यंदा गुरुवार १० जून २०२१ पासून बुधवार १६ जून २०२१ पर्यंत महाराष्ट्रात दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. औषधांच्या अतिरेकी वापरामुळे काही जणांना कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस होत आहे. या आजारात दृष्टी जाण्याचा मोठा धोका आहे. यामुळेच दृष्टी दिन सप्ताहात राज्यात म्युकरमायकोसिस संदर्भात जनजागृती केली जाईल; असे आरोग्यमंत्री म्हणाले. Vision day week in Maharashtra

महाराष्ट्रात कोरोना संकट सुरू असूनही वर्षभरात सुमारे २ लाख २८ हजार मोतिबिंदू शस्त्रक्रिया झाल्या. आता दृष्टी दिन सप्ताहाच्या निमित्ताने कर्करोगी आणि मधुमेहींची प्राधान्याने नेत्र तपासणी होईल. आवश्यकता भासल्यास या रुग्णांवर तातडीने आवश्यक उपचार केले जातील. म्युकरमायकोसिसचा सर्वात मोठा धोका कर्करोग किंवा मधुमेह यापैकी एखाद्या आजाराने पीडित व्यक्तींना आहे. या व्यक्तींना कोरोना झाल्यास त्यांच्या तब्येतीच्या समस्या बळावतात असे आढळले आहे. यामुळे या रुग्णांना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. यासाठी जनजगागृती शिबीर, वेबिनार यांचे आयोजन केले जाईल.

शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले, खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ८० हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचा जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक १० जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतिनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरु आहेत; असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

एक डोळा असलेले कोकरू

महाराष्ट्रात ६९ नेत्र पेढ्या, ७७ नेत्र संकलन केंद्र, १६७ नेत्र संकलन केंद्र कार्यरत आहेत. राज्यात वर्षभरात १३५५ नेत्र बुब्बुळांचे संकलन केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी