Maharashtra MLC Election :मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ (Graduate And Teacher Constituency Election)निवडणुकीसाठी आज मतदान (vote) होणार आहे. नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघात मतदान होत आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. भाजपने विदर्भ, मराठवाड्यातील उमेदवारांसाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील साठीमारीच्या राजकारणामुळे रंगत आली आहे. दोन फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. (Voting today for graduate and teacher constituencies in the state)
अधिक वाचा : महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा
महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर इथल्या मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. तर महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणी शुभांगी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.
अधिक वाचा : भररस्त्यात आरोग्य मंत्री नाबा दास यांची हत्या
भाजपने उमेदवारही दिलेला नाही आणि आपला पाठिंबा कोणाला आहे हेही स्पष्ट केले नाही. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तांबे यांचा प्रचार सुरू केल्याचे भाजपच्या विखे गटातून बोलले जात आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.याशिवाय नागपूर शिक्षक मतदारसंघही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.
अधिक वाचा : इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने जिंकला विश्वचषक
नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचे आव्हान आहे. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत असून धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. तर भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.