Wankhede- Nawab Malik Dispute : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस रचून पैसे उकाळले?, मलिकांनी दिला पुरावा, म्हणाले 1 हजार कोटींपेक्षा जास्त झाली वसुली

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 26, 2021 | 15:17 IST

Sameer Wankhede- Nawab Malik Dispute: आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्सच्या प्रकरणात (Drugs Cases) अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spokesperson)  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sameer Wankhede fabricated 26 fake cases and made money?,
Wankhede- Nawab Malik Dispute : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस रचून पैसे उकाळले?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिक यांनी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याच्या पत्राच्या आधारे समीर वानखेडेवर आरोप केले आहेत.
  • चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
  • समीर वानखेडे छापेमारीदरम्यान बॉलिवूड कलाकार, मॉडेल अथवा सेलिब्रेटी मिळाल्यास जबरदस्ती तो ड्रग्ज असल्याचे दाखवून फसवतो अन् केस तयार करतो.

मुंबई: Sameer Wankhede- Nawab Malik Dispute: आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्सच्या प्रकरणात (Drugs Cases) अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spokesperson)  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सकाळी ट्विट(Tweet) करत आपण वानखेडे विषयी नवीन २६ गौप्यस्फोट करणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले होती. सकाळच्या ट्विटमध्ये त्यांनी आपल्याला एका एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवलं आहे. त्यावरुन आपण वानखेडेंची पोलखोल करणार असल्याचं मलिक म्हणाले होते. एका अज्ञात एनसीबी आधिकाऱ्याकडून पत्र मिळताच मलिक यांनी ते पत्र ट्विटर पोस्ट केलं आहे.

या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आले आहे अथवा फसवण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवले असून एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. 

पत्रानुसार, Cordeilia क्रूझवरील केस Cordeilia cruise Case According letter

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या क्रूज प्रकरणाचाही 26 केसेसचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटले आहे की, "केस  क्रमांक 94/2021 मध्ये Cordeilia क्रूझवरील केसमधील पंचनामे एनसीबी कार्यालयात झाले. भाजपच्या इशाऱ्यावर सर्व कारवाई झाली. दोन जणांच्या मदतीने समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पुरावे पेरले. क्रूजवर NCB कर्मचारी विश्व विजय सिंग, आशीष रंजन किरण बाबू, विशावनाथ तिवारी व सुधाकर शिंदे, OTC कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मिना, ड्रायव्हर अनिल माने आणि खासगी सचिव शरद कुमार व अन्य कर्माचाऱ्यांनी आपल्या सामानात लपवून ड्रग्ज नेले. संधी साधून लोकांच्या सामानात ड्रग्ज लपवले गेले. 

समीर वानखेडे छापेमारीदरम्यान बॉलिवूड कलाकार, मॉडेल अथवा सेलिब्रेटी मिळाल्यास जबरदस्ती तो ड्रग्ज असल्याचे दाखवून फसवतो अन् केस तयार करतो. समीर गेल्या महिन्याभरापासून भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांसोबत (के. पी गोसावी आणि मनिष भानूशाली) संपर्कात आहेत.  क्रूजवर जितक्या लोकांना पकडले, त्या सर्वांना एनसीबी कार्यालयात आणले गेले. सर्व पंचनामे एनसीबीच्या कार्यालयात करण्यात आले. दिल्लीवरुन फोन आल्यानंतर रिशब सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्नीचारवाला यांना त्याच रात्री सोडण्यात आले. याप्रकरणात समीर वानखेडे यांची कॉल डिटेल्स चेक करू शकता. या प्रकरणात अरबाज मर्चंट याचा मित्र अब्दुलजवळ ड्रग्ज मिळाले नव्हते. पण समीर वानखेडे यांनी ड्रग्जची खोटी केस केली. समीर वानखेडे यांनी या प्रकरणात आपला वाहन चालक विजय याला पंच केले आहे. नियमांनुसार, साक्षीदार स्वतंत्र असायला हवा. हे सर्व प्रकरण बनावट आहे. या प्रकरणात मिळालेलं ड्रग्ज समीर वानखेडे यांनी पेरलेलं आहे."

एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्यानं नवाब मलिक यांना पाठवेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत... 26 केसेसशिवाय इतरही आरोप करण्यात आले आहेत.

 काय आहेत आरोप What are the allegations

1) समीर वानखेडे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत चार प्रमाणिक एनसीबी आधिकाऱ्यांना निलंबीत केलं.
2) राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरुन समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला टार्गेट केलं. कोट्यवधी रुपये वसूल केले. वकील अयाज खान यांच्यामार्फत पैसे गोळा केले. महनियाला बॉलिवूड कलाकारांकडून वसूली केली जाते. या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती व अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे.
3) समीर वानखेडे वसूली अधिकारी आहे. प्रसारमाध्यमात राहण त्याला आवडतं. त्यासाठी तो निर्दोष लोकांना फसवतो. यासाठी 13 जणांची टीम बनवली आहे. 
4) समीर वानखेडे यांच्या मुंबई बदली प्रकरणामध्ये अमित शाह यांचे कनेक्शनही पत्रात सांगितले आहे. 
5) पाळलेल्या गुंडाच्या मार्फत ड्रग्ज खरेदी करुन खोट्य केसेस करत आहे.  लोकांकडे ड्रग्ज पेरले जात होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात होती. 
6) समीर वानखेडे यांनी मुंबईत कार्यभार सांभाळल्यापासून अटक केलेल्या 25 जणांकडून कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या. आपल्या मर्जीने पंचनामा बदलला. 
7) समीर वानखेडे यांच्या केबिनमध्ये थोड्याप्रमाणात ड्रग्ज असेल. 
8) समीर वानखेडे आपल्या वसूलीतील काही रक्कम वरिष्ठ आधिकाऱ्यालाही देतो.
9) समीर वानखेडे यांनी पकडलेल्या सर्व आरोपींची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल.
10) महाराष्ट्र सरकारने समीर वाखेडे यांच्यावर तपास समिती नेमावी, सत्य समोर येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी