Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची (Farmers)चांगलीच धावपळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळबाग उत्पादक शेतकरीही (Orchard producer)चिंतेत पडले आहेत. येत्या 24 तासात अजून पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने खरीप प्रमाणे हा रबी हंगामही वाया जाणार की काय, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. (Warning of unseasonal rain again in the state; Baliraja's anxiety increased)
अधिक वाचा : शॉक लागून बीडचा टिक टॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या 24 तासांत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बुधवारी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधरण पाच मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली आहे. राज्यातील कोण-कोणत्या भागात पाऊस झाला त्याची माहिती जाणून घेऊ.
अधिक वाचा : 'या' 4 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार विशेष बदल
बुधवारी नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला. पंचवटी, सिडको, गंगापूररोड, इंदिरानगरसह नाशिकरोड, विहितगाव, लॅमरोड भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. तर मायको सर्कल, मुंबईनाका, गंगापूररोड, दहिपूलसारख्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
वाशिम जिल्ह्यात रात्री उशिरा पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचा धोका वाढला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळं आधीच पीक संकटात आल्यानंतर आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं खरीप पिकानंतर आता रब्बी पिकांचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अधिक वाचा : समृद्धी महामार्गावर 'लालपरी' धावणार; जाणून घ्या बस भाडे किती
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. दोन दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. बुलढाणा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रब्बीची पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मोताळा तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. काल हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.गहू, हरभरा, ज्वारी, तूर यासह अन्य फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.