Weather Forecast Mumbai, Pune: शेतकऱ्यांची चिंता वाढणार; मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 30, 2023 | 10:30 IST

Unseasonal Rain Warning : पुढील चार ते पाच दिवस राज्यात सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD)वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra)आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Chance of unseasonal rain in Madhya Maharashtra and Marathwada
मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट असणार
  • राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
  • बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम

Weather Forecast Mumbai, Pune, Nashik in Marathi : राज्यात  शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढवणारी बातमी हवामान विभागाने (Department of Meteorology)दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD)वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra)आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal)तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Warning of unseasonal rain in some parts of Madhya Maharashtra and Marathwada)

अधिक वाचा  :  महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त इमेजद्वारे करा अभिवादन
 दरम्यान हवामान विभागानुसार, राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्रात ही लाट  अधिक प्रमाणात असेल तर मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते. किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  : असं करा महात्मा गांधींजी यांच्या पुण्यतिथीचं भाषण

बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका 

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस आला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. 

अधिक वाचा  : महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा

राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.  गहू , हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी