SBI Dahisar । Watch video : स्टेट बँकेतील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 30, 2021 | 20:01 IST

Watch video : Mumbai Police arrest two people involved in SBI firing at Dahisar : मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये स्टेट बँकेच्या शाखेवर दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेत काम करणाऱ्या एक कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

Watch video : Mumbai Police arrest two people involved in SBI firing at Dahisar
स्टेट बँकेतील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बँकेतील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक
  • सीसीटीव्ही फूटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी केली कारवाई
  • २४ तासांच्या आत दोन जणांना अटक

Watch video : Mumbai Police arrest two people involved in SBI firing at Dahisar : मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये स्टेट बँकेच्या शाखेवर दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेत काम करणाऱ्या एक कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

सीसीटीव्ही फूटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन जणांना अटक केली. अटक केलेल्यांची नावं पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला त्यावेळी मास्कने चेहरा झाकला होता आणि ते हिंदी भाषेत एकमेकांशी बोलत होते.

एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डार्क जीन्स घातली होती. याच दरोडेखोराने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. गोळीबार करणाऱ्याने स्वतःचा चेहरा लाल रंगाच्या कापडाने झाकला होता. तर त्याच्या सहकाऱ्याने डार्क निळ्या रंगाचा शर्ट-जीन्स आणि टोपी घातली होती. 

पोलिसांनी आठ पथके तयार करुन वेगाने तपास केला आणि दोन जणांना अटक केली. दरोडेखोरांपैकी एकाच्या चपला बँकेत राहिल्या. पोलिसांनी या चपला पाहून श्वान पथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध सुरू केला आणि २४ तासांच्या आत दोघांना अटक केली.

गुरुकुल सोसायटी येथील स्टेट बँकेच्या शाखेत जेमतेम आठ-दहा जण काम करतात. या छोट्या शाखेत शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणे सोपे आहे असे जाणवल्यामुळे दरोडेखोरांनी या शाखेची निवड केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यावर माहिती देऊ; असे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी काय घडले दहिसरच्या स्टेट बँकेच्या शाखेत?

दहिसरच्या एमएचबी कॉलनी परिसरातील एस व्ही रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवार २९ डिसेंबर २०२१ रोजी दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर गोळीबार करून अडीच लाख रुपयांची रोकड लुटून पळ काढला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

दरोडेखोरांनी कॅशियरला पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यावेळी बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संदेश गोमारे यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. हे पाहून दरोडेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात संदेश गोमारे (२५) यांचा मृत्यू झाला. हे पाहून बँकेत असलेले सर्वजण घाबरले. कॅशियरकडे असलेली अडीच लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले. 

दरोडा प्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात छातीत जवळून गोळी लागल्यामुळे संदेश गोमारे यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी