Mantralaya Mumbai: मंत्रालयात Water bottle not Allowed! प्लास्टिक फ्री मंत्रालयासाठी नाही तर आत्महत्या रोखण्यासाठी बॉटलवर बंदी

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 19, 2022 | 08:47 IST

मुंबईत (Mumbai News) अनेकदा मंत्रालयात वेगवेगळ्या कामासाठी राज्यभरातून लोक येत असतात. त्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काम करुन घेण्यासाठी तुम्हाला तेथे जावे लागत असेल तर तुम्हाला हाता फक्त कागदपत्रेच ठेवावे लागतील. कागदपत्रांसोबत तुम्हाला पाणी बॉटल बाळगता येणार नाहीये. कारण मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी (Water bottle ban) घालण्यात आली आहे.

Citizens have heard! Water Bottle not Allowed in Mantralaya
नागरिकांनो ऐकलं का! मंत्रालयात Water Bottle not Allowed   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : मुंबईत (Mumbai News) अनेकदा मंत्रालयात वेगवेगळ्या कामासाठी राज्यभरातून लोक येत असतात. त्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काम करुन घेण्यासाठी तुम्हाला तेथे जावे लागत असेल तर तुम्हाला हाता फक्त कागदपत्रेच ठेवावे लागतील. कागदपत्रांसोबत तुम्हाला पाणी बॉटल बाळगता येणार नाहीये. कारण मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी (Water bottle ban) घालण्यात आली आहे. त्यामुळे भेटीगाठींसाठी येणाऱ्यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची बाटली ठेवून आत जावं लागले. आता तुम्ही म्हणाल हा नियम प्लास्टिक फ्री मंत्रालयासाठी असेल. परंतु हा नियम आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात आला आहे.  

मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्याचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे. काम करण्यासाठी राज्यभरातून नागरिक मंत्रालयात येत असतात. परंतु काम झाले नाही तर वा न होणारे काम प्रशासनाने करावे या हट्टापोटी अनेक जण पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक वा रॉकेल घेऊन येतात व ते प्राशन करण्याचा वा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा आत्महत्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळ सध्या पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे.

Read Also : 100 टक्के योग्य कामगिरी होत नसल्यानं Ben Stokesची निवृत्ती

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जनता मंत्रालयात येत असते. याआधीही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. मध्यंतरीही मंत्रालयात विष प्रशान करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आता खबरदारी घेतली जाते आहे. सर्व सामान्य नागरिकांना आकाशवाणी समोरच्या प्रवेशद्वाराजवळूनच मंत्रालयात प्रवेश देण्यात येत आहे. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याचवेळी पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई केली जात आहे.

गुटखाबंदी, पण भिंती बरबटलेल्या…

दुसरीकडे मंत्रालयात गुटखाबंदी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भेटीगाठींसाठी येणाऱ्यांच्या बॅग आणि खिशांची तपासणी होते. पान तंबाखूच्या पुड्या गेटवर काढून घेतल्या जातात. पण तरीही अनेकजण छुप्या मार्गाने तंबाखूच्या पुड्या मंत्रालयात घेऊन जात असल्याचंही दिसून आलंय. मंत्रालयातील स्वच्छतागृहात गुटखा खाऊन थुंकल्यानं बेसिन तुंबल्याचे प्रक्रार समोर आलेले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी