Mumbai Water Cut : मुंबईतील या भागात 2 आणि 3 मार्चला पाणीकपात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 28, 2023 | 11:25 IST

Water cut in Bhandup and Vikhroli and Ghatkopar on March 2 and 3 : भांडुप, कांजूरमार्ग या एस विभागात तसेच घाटकोपर आणि विद्याविहार या एन विभागातील काही परिसरांमध्ये गुरुवार 2 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पासून शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

Water cut in Bhandup and Vikhroli and Ghatkopar on March 2 and 3
मुंबईतील 2 आणि 3 मार्चला पाणीकपात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Mumbai Water Cut : मुंबईतील या भागात 2 आणि 3 मार्चला पाणीकपात
  • गुरुवार 2 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पासून शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद
  • पाणी जपून वापरा

Water cut in Bhandup and Vikhroli and Ghatkopar on March 2 and 3 : मुंबई महानगरपालिका भांडुप पश्चिमेच्या एस विभागातील क्वारी रोड येथे 1200 मिलीमीटर आणि 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीचे काम करणार आहे. या कामामुळे भांडुप, कांजूरमार्ग या एस विभागात तसेच घाटकोपर आणि विद्याविहार या एन विभागातील काही परिसरांमध्ये गुरुवार 2 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पासून शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार : 

अ. भांडुप आणि कांजूरमार्ग एस विभाग

  1. प्रताप नगर रस्ता लगतचा परिसर, कांबळे कंपाऊंड, जमील नगर, कोकण नगर, समर्थ नगर, मुथू कंपाऊंड, संत रोहिदास नगर, राजा कॉलनी, शिंदे मैदान, सोनापूर, शास्त्रीनगर, लेक मार्ग,सीएट टायर मार्ग,सुभाष नगर, आंबेवाडी, गावदेवी मार्ग, सर्वोदय नगर, भट्टीपाडा, जंगल मंगल मार्ग, भांडूप (पश्चिम), जनता बाजार (मार्केट), ईश्वर नगर, टॅंक मार्ग, राजदीप नगर, उषा नगर, व्हिलेज मार्ग, नरदास नगर, शिवाजी नगर, टेंभीपाडा, कौरी मार्ग लगतचा परिसर, कोंबडी गल्ली, फरीद नगर, महाराष्ट्र नगर, अमर कौर विद्यालय परिसर, काजू टेकडी, जैन मंदीर गल्ली, बुद्ध नगर, एकता पोलिस चौकी लगतचा परिसर, उत्कर्ष नगर, फुगेवाला कंपाऊंड, कासार कंपाऊंड, लाल बहादूर शास्त्री रस्त्यालगतचा परिसर 
  2. जुना हनुमान नगर, नवा हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी फुले नगर
  3. रमाबाई आंबेडकर नगर – १ आणि २, साई विहार, साई हिल
  4. लाल बहादूर शास्त्री मार्गा लगतचा मंगतराम पेट्रोल पंप पासून ते गुलाटी पेट्रोल पंप विक्रोळी पर्यंतचा परिसर, कांजूरमार्ग (पश्चिम) रेल्वे स्थानक लगतचा परिसर, नेव्हल कॉलनी, डॉकयार्ड  कॉलनी, सूर्यानगर, चंदन नगर, सनसिटी, गांधी नगर आंबेवाडी, इस्लामपुरा मस्जिद, विक्रोळी स्थानक (पश्चिम) लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री लगतच्या औद्योगिक वसाहती, DGQA वसाहत, गोदरेज निवासी वसाहत, संतोषी माता नगर (टागोर नगर क्रमांक ५ – विक्रोळी पूर्व)

ब. विक्रोळी आणि घाटकोपर एन विभाग

  1. लाल बहादूर शास्त्री मार्ग विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी पार्क साईट व लोअर डेपो, पाडा पंपिंग स्टेशन वरुन पाणी पुरवठा होणारे इतर विभाग – लोअर डेपो पाडा, अप्पर डेपो पाडा, सागर नगर, म्युनिसिपल बिल्डिंग झोन
  2. वीर सावरकर मार्ग
  3. लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), वाधवा, कल्पतरू, दामोदर पार्क, साईनाथ नगर मार्ग, उद्यान गल्ली, संघानी इस्टेट

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय ।  या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी