पाणी बंद; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीला फटका

के वेस्ट वॉर्ड (अंधेरी पश्चिम), के इस्ट वॉर्ड (जोगेश्वरी) आणि पी साऊथ वॉर्ड (गोरेगाव) या भागांना २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी पाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

Water Cut in Goregaon, Jogeshwari, Andheri
पाणी बंद; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीला फटका 

थोडं पण कामाचं

  • पाणी बंद; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीला फटका
  • मुंबई मनपाच्या जलवाहिनीच्या डायव्हर्जनचे काम
  • के इस्ट आणि वेस्ट वॉर्ड तसेच पी साऊथ वॉर्डमधील भागांमध्ये 'पाणीबाणी'

मुंबईः के वेस्ट वॉर्ड (अंधेरी पश्चिम), के इस्ट वॉर्ड (जोगेश्वरी) आणि पी साऊथ वॉर्ड (गोरेगाव) या भागांना २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. जलवाहिनी (पाइपलाइन) बदलण्याचे काम होणार असल्यामुळे या भागातील पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. (Water Cut in Goregaon, Jogeshwari, Andheri)

मुंबई मनपाच्या जलवाहिनीच्या डायव्हर्जनचे काम

मुंबई मनपा ९०० मिमी आणि १२०० मिमी जलवाहिनीचे डायव्हर्जनचे काम करणार आहे. हे काम बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवारी २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत संपेल. ज्या भागांमध्ये रात्री पाणी पुरवठा होता त्या भागांमध्ये २४ फेब्रुवारीच्या रात्री आणि ज्या भागांमध्ये दिवसा पाणी पुरवठा होतो त्या भागांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे के वेस्ट वॉर्ड (अंधेरी पश्चिम), के इस्ट वॉर्ड (जोगेश्वरी) आणि पी साऊथ वॉर्ड (गोरेगाव) या भागांना २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी आधीच पाण्याचे नियोजन करावे. गरजेपुरते पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा; असे आवाहन मुंबई मनपाने केले आहे.

के इस्ट आणि वेस्ट वॉर्ड तसेच पी साऊथ वॉर्डमधील भागांमध्ये 'पाणीबाणी'

के वेस्ट वॉर्ड येथील स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड), अमृत नगर, गुलशन नगर, के इस्ट वॉर्ड येथील मजास, जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आणि आसपासचा परिसर, प्रेम नगर तसेच पी साऊथ वॉर्ड येथील बिंबिसार नगर या भागांना प्रामुख्याने पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. ही बाब लक्षात घेऊन संबंधित भागांसाठी आधी अतिरिक्त पाणी पुरवठा केला जाईल. 

दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या भागाला बसलेला पाणी संकटाचा फटका

चकाला येथे व्हॉल्व्ह बदलण्याच्या कामाचा फटका बसल्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम पासून वांद्रे पूर्व-पश्चिम पर्यंतच्या अनेक भागांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच अंधेरी पूर्व येथील दोन मुख्य जलवाहिन्यांच्या कामामुळे के वेस्ट वॉर्ड, के इस्ट वॉर्ड तसेच एच इस्ट आणि एच वेस्ट वॉर्ड यांचा पाणी पुरवठा २ आणि ३ फेब्रुवारी रोजी बंद झाला होता. आता २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होणार आहे. पण जलवाहिन्यांशी संबंधित काम आवश्यक आहे. दीर्घकाळ सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी हे काम सुरू आहे. नागरिकांनी त्यांच्या दीर्घकालीन सोयीचा विचार करुन तात्पुरत्या गैरसोयीचा त्रास सहन करावा, असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये किमान १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. यंदा पुरेसा पाऊस पडल्यामुळे मुंबईला सध्या पाणी कपातीची चिंता नाही. मात्र देखभाल, दुरुस्ती, जलवाहिनी बदलणे अशा कामांमुळे काही भागांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

पालिकेचे नागरिकांना आवाहन

  1. पाणी जपून वापरा.
  2. आवश्यक ते पाणी आदल्या दिवशी घरी साठवून ठेवा.
  3. बादल्या अथवा टाक्यांमधून साठवलेल्या पाण्यात कचरा, धूळ, माती पडणार नाही याची काळजी घ्या.
  4. पाणी झाकून ठेवा.
  5. पाण्याचा वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी