Water Cut In Mumbai: अजून दोन दिवस मुंबईत पाणी कपात, या भागात होणार मोठा परिणाम 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील काही भागात पाणीकपात होत आहे. तसेच ही पाणी कपात आणखी दोन दिवस होणार असल्याचे बीसीएमसीने पत्रकाद्वारे म्हटले आहे.  या संदर्भात बीएमसीने एक पत्रक काढून माहिती दिली आहे.  मंगळवार पासून म्हणजे २४ ते २७ मे पर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत ३ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

water cut in mumbai between 24th and 27th may know the area read in marathi
अजून दोन दिवस मुंबईत पाणी कपात, या भागात होणार मोठा परिणाम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील विविध भागात तळपत्या उन्हात पाणी संकट निर्माण झाले आहे.
  • औरंगाबादमध्ये तर भाजपतर्फे आंदोलन करून हंडा मोर्चा काढण्यात आला.
  • नागपुरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मुंबई :  महाराष्ट्रातील विविध भागात तळपत्या उन्हात पाणी संकट निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये तर भाजपतर्फे आंदोलन करून हंडा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता नियमित पाणी पुरवठा होणाऱ्या मुंबईतही पाणी कपातीची झळ बसणार आहे. (water cut in mumbai between 24th and 27th may know the area read in marathi )

24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे.  बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल. बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित भागातील नागरिकांनी वर नमूद केलेल्या कालावधीत पाणी कपातीच्या एक दिवस अगोदर आवश्यक पाण्याचा साठा ठेवावा असे आवाहन आहे. 

विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर यांसारख्या पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून बीएमसीने आधीच कळवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी