Water cut in Mumbai from 24th to 27th May 2022 : मुंबई : पांजरपूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे करायचे असल्यामुळे मुंबई महानगरपालिका पाणीकपात करणार आहे. मुंबईत २४ मे ते २७ मे २०२२ या कालावधीत पाच टक्के पाणीकपात केली जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पाणीकपात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रक काढून पाणीकपातीची माहिती दिली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवार २४ मे २०२२ पासून शुक्रवार २७ मे २०२२ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दररोज पाच टक्के पाणीकपात होणार आहे. पाणीकपात करावी लागणार असल्यामुळे नागरिकांनी गरजेप्रमाणे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे; अशा स्वरुपाचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. पाणीकपातीचा फटका मुंबई महानगरपालिकेच्या ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, आणि टी या विभागांना बसणार आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि पूर्व उपनगरांच्या कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर या भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.