Water cut in Mumbai from 9 March to 11 March : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील 11 वॉर्डात गुरुवार 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शनिवार 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणीकपात होणार आहे. कोपरी येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे नवा पूल बांधण्यात येत आहे. या बांधकामादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या 2345 मिमी व्यासाचा मुंबई 2 ट्रंक मेन खराब झाला. पाणी गळती सुरू झाली. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगर भागात एम पूर्व आणि एम पश्चिम वॉर्ड, टी वॉर्ड, मुलुंड पूर्व आणि पश्चिम विभाग, एस वॉर्ड, भांडुप पूर्व, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व विभाग, एन वॉर्ड विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम विभाग आणि एल वॉर्ड कुर्ला पूर्व विभाग येथे पाणीकपात होणार आहे. संपूर्ण बी वॉर्ड, ई वॉर्ड, एफ दक्षिण (एफ साउथ) आणि एफ उत्तर (एफ नॉर्थ), बॉम्बे पोर्ट ट्रस्ट तसेच ए वॉर्डमधील नेव्हल एरिया या भागांमध्ये पाणीकपात केली जाईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
Holi DP : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसाठी होळी डीपी । अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात
Ghee Purity Check Tips : तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे तंत्र । खऱ्याखोट्या मनुका तपासण्याचे तंत्र
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.