Mumbai Water shortage:  मुंबईत पाणी गळतीमुळे या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पवई येथे वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली.

Water leak in Mumbai affects water supply in the Some parts
मुंबईत पाणी गळतीमुळे या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा प्रभावीत
  • जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
  • युद्ध पातळीवर दुरुस्ती काम सुरु; उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होणार

मुंबई : दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पवई येथे वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे सदर गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. सदर दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणा-या थेट पाणीपुरवठ्यावर दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे. तरी या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे. 

वरील तपशिलानुसार दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ज्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणा-या परिसरांची विभागनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. जी दक्षिण विभागः वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग

२. जी उत्तर विभागः माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी

३. डी विभागः लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग

४. ए विभागः कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी

गळती दुरुस्तीच्या कामामुळे उपरोक्त परिसरांमध्ये दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजीसुद्धा कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
..

री संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सदर कामाच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी