मुंबईत २६ ऑक्टोबरला पाणीकपात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 23, 2021 | 13:17 IST

water supply cut in mumbai for repairing and maintenance work मुंबईत मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे.

water supply cut in mumbai for repairing and maintenance work
मुंबईत २६ ऑक्टोबरला पाणीकपात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मुंबईत २६ ऑक्टोबरला पाणीकपात
 • मुंबईतील निवडक भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात
 • विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी तसेच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या भागांमध्ये १०० टक्के पाणीकपात

मुंबईः मुंबईत मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष पंपिंग स्टेशनच्या बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दोन झडपा बदलण्याचे तसेच पिसे-पांजरपूर संकुल येथील तिसऱ्या टप्प्याच्या पंपिंग स्टेशनच्या एका बिघडलेल्या पंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांमुळे मुंबईतील निवडक भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात केली जाईल. काम मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पूर्ण केले जाईल. water supply cut in mumbai for repairing and maintenance work

पवई येथे १८०० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येईल. हे काम बुधवारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल. या कामामुळे मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी तसेच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या भागांमध्ये १०० टक्के पाणीकपात केली जाईल.

ज्या भागांमध्ये पाणीकपात आहे त्या भागांतील नागरिकांनी आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करुन ठेवावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे. 

या भागांमध्ये होईल पाणीकपात

 1. एस विभाग: फिल्टरपाडा एस एक्स-०६-(२४ तास कपात)- जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
 2. के/पूर्व विभाग: मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१- (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कपात)- चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
 3. के/पूर्व विभाग: सहार रोड क्षेत्र, केई ०१- (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कपात) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
 4. महापालिका के/पूर्व विभाग: ओम नगर क्षेत्र, केई ०२– (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत कपात) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
 5. के/पूर्व विभाग: एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १०- (सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत कपात) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
 6. के/पूर्व विभाग: विजय नगर मरोळ क्षेत्र, केई -१०ए-(सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कपात)- विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
 7. के/पूर्व विभाग: सिप्झ, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास कपात)
 8. एच/पूर्व विभाग: बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
 9. जी/उत्तर विभागः धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र- (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत कपात) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
 10. जी/उत्तर विभाग: धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र– (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कपात) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी